मालवण | प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज मंदिर, बांगीवाडा येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रवक्ते मंदार केणी, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, सुरेश मडये, बाळा जाधव उपस्थित होते.