‘त्या’कार्यकर्त्याचा शिवसेना पक्षाशी कोणताही संबंध नसून ‘तो’ फिरता चषक असल्याची मालडी विभाग प्रमुख श्री. सुनिल घाडीगावकर यांची प्रतिक्रिया.
प्रतिनिधी : शिवसेना मालडी विभाग प्रमुख श्री. सुनिल घाडीगावकर प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले की, आडवली मालडी मतदार संघातील श्री .प्रशांत सावंत (बाबा ) हे स्वतः फिरता चषक आहेत. ठेकेदारी साठी निलेश राणे साहेबांना फोन करून पायघड्या घालणारे तसेच आपल्या आर्थिक फायद्यासाठी एका समाजाला वेठीस धरून आपण कुठल्याच पक्षाचे नाही आहोत अशी वल्गणा करणारे प्रशांत सावंत आपल्याच कामगाराला वैभव नाईक यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करून आपली उंची वाढवण्याची व आपण प्रामाणिक व निष्ठावान असल्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रवेशाचा कोणताही परिणाम असरोंडी गावातील मताधिक्यावर होणार नाही अशी प्रतिक्रिया आडवली मालडी विभाग प्रमुख श्री. सुनिल घाडीगावकर यांनी दिली आहे.