मसुरे | प्रतिनिधी : उदे…. उदे ….उदे…! श्री पावणाई देवीचा जयजयकार….. श्री भगवती मातेचा जयजयकर…! अशा जयघोषात मालवण तालुक्यातील बांदिवडे येथील श्री पावणाई भगवती मंदिर येथे नवीन मांडणीचा दुसरा वार्षिक गोंधळ मोठ्या उत्साहात शुक्रवारी संपन्न झाला. सकाळी देवीची विधीवत पुजा झाल्या नंतर सुवर्णलंकार व भरजरी वस्त्रानी देवीला सजविण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी माहेरवाशीणीनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. रांगेतुन सर्वाना दर्शन मिळावे यासाठी वेळोवेळी सुचना देण्यात येत होत्या. रात्री दिवटी पुजन व मांड भरल्या नंतर गोंधळ कार्यक्रम झाला. दिवटीस भक्तिने तेल अर्पण करण्यात आले. व त्यानंतर महाप्रसाद सर्वाना देण्यात आला. रात्री उशिरा वाढलेल्या थंडीची तमा न बाळगता हजारो भविकांची यावेळी गर्दी झाली होती. सर्वांना महाप्रसाद मिळावा यासाठी सर्व कार्यकर्ते मेहनत घेतला होते. उत्सवा निमित्त देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला होता. मुंबई येथील शाम डेकोरेटर्सचे शाम परब यानी सर्व विद्युत रोषणाई केली होती. बांदिवडे पंचक्रोशीसह विविध ठिकाणाहुन आलेल्या देवीच्या भक्तानी, तसेच मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमान्यानी उपस्थिती दर्शविली. मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी रात्री देवीचे दर्शन घेतले.



गोंधळ कार्यक्रमास प्रारंभ झाल्या नंतर रात्री नेत्रदीपक फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. देवालय परिसरात हंगामी स्वरुपाची हॉटेल, मिठाई दुकाने, बचत गटांचे स्टॉल, खेळण्यांची दुकाने, ओटी साहित्य दुकानें उभारण्यात आली होती. खेळणी खरेदी करण्यासाठी लहान मुलानी गर्दी केली होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. देवस्थान मानकरी व ग्रामस्थ, माहेर वाशिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी श्री. साई प्रभु, प्रफुल्ल प्रभू, आप्पा गोविंद परब, दिनेश परब, मधुकर परब, आनंद परब, विश्वनाथ परब, आप्पा दिनकर परब, नारायण परब, चंद्रकांत परब, सागर परब, अनिल परब, मनोहर परब, उदय सावंत, आबा आईर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, सोनू सावंत, राजेंद्र परब, जगन्नाथ परब, शिवराम परब, वासुदेव सावंत, अशोक परब, प्रथमेश नाईक, राजेश दळवी सिताराम परब, प्रकाश परब, लाडोबा परब, सदानंद परब, के. के. सावंत, नयन भट, विनय सावंत, नितीन परब, अशोक परब, उल्हास परब, रमेश परब, राजेंद्र सावंत, सत्यवान सावंत, अनुराधा गावकर, प्रशांत परब, उदय परब, विकास भट, मंगेश चव्हाण, यशवंत परब, उत्तम परब, शैलेश राणे, सुधीर घाडी आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. उत्सव यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.