शिवसैनिकांच्या रक्तातला भगवा निलेश राणेंच्या रुपाने कुडाळ मालवणमध्ये फडकवण्याचा निर्धार.
प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब येथे शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्री. जयंतीदेवी मंदिर येथून शुभारंभ झाला. त्यानंतर पळसंब गावात घरोघरी प्रचाराला सुरुवात करण्यात आली . यावेळी शिवसेना विभागप्रमुख माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व माजी यांची प्रमुख उपस्थिती होती. पळसंब महिला शाखा प्रमुख सौ. दक्षता सावंत यांच्या नेतृत्वाखाली गावातील अनेक महिलांनी सहभाग घेत घरोघरी भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली. त्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावाळी शिवसेना विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत गोलतकर, पळसंब सरपंच श्री. महेश वरक, शाखा प्रमुख विवेक पुजारे, माजी उप सरपंच सुहास सावंत, युवा शाखा प्रमुख मनीष पुजारे, युवा उप विभाग प्रमुख रुपेश पुजारे, प्रसाद पुजारे, सुभाष तर्फे, कृष्णा आपकर, अरुण माने, नितीन सावंत, महेश वायंगणकर, अशोक जुवेकर, गणेश सावंत, रामकृष्ण पुजारे, महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आचरा मतदार संघातून प्रत्येक गावातून मोठ्या मताधिक्यासाठी महिला रणरागीणी ‘डोर टू डोर’ प्रचार करत असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू राहावी यासाठीच महिला मोठ्या संख्येने प्रचाराला घरोघरी पोहोचत आहेत. महिला तरुण वर्गाचा मतदारा असलेल्या मोठा प्रतिसाद असून श्री.निलेश राणे यांना धनुष्यबाणावर शिक्का मारत विजयी करत विधान सभेवर भगवा फडकवणार हे शिवसैनिकांचे स्वप्न २३ तारीखला सत्यात उतरेल असे पळसंब सरपंच तथा शिवसेना आचरा विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी प्रतिपादन केले आहे.