देवगड | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील हिंदळे मोर्वे येथील श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे आयोजित श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे, सात दिवस विविध भजनी मंडळी यांची सुस्वर भजने व भजनी दिंड्या यांचे सादरीकरण होणार आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी १२ वाजता प्रसाद आरती, सायंकाळी ८ वाजता प्रदक्षिणा आरती, रात्रौ दिंडी,भजन मेळ्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री विष्णू अवतारांचे सादरीकरण (दहीकाला) आणि मिरवणूक काढत घट विसर्जन सोहळा,२४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्रौ ८ वाजता ग्रंथ वाचन आरती आदी कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व भाविकांनी हरीनाम सप्ताहला उपस्थित रहावे असे आवाहन श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे यांच्या वतीने करण्यात आले आहे.