जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.
मालवणः चिंदर येथील मनोज प्रकाश हडकर यांची शिवसेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा सोशल मिडीयाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करत अभिनंदन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख महेश राणे, आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर, उद्योजक संतोष कोदे, अभय भोसले, सचिन हडकर, दादा साईल, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, युवा जिल्हा संपर्क प्रमुख मंदार लुडबे, बांदिवडे सरपंच तथा उप तालुकाप्रमुख आशुतोष मयेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.