शिवसेना आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी शिवसैनिकांच्या वतीने केले आशु मयेकर यांचे पक्षात स्वागत.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा विभागातल्या बांदिवडे गांवचे सरपंच आशू मयेकर यांनी महायुतीचे खासदार नारायण राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि मालवण तालुकाप्रमुख महेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे आचरा विभागप्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले आहे की आशू मयेकर यांचे शिवसेनेच्या वतीने त्यांचे स्वागत आहे. बांदिवडे गावच्या विकासासाठी मयेकर यांनी घेतलेला निर्णय योग्यच असून बांदिवडे गावातील तरूण वर्गात व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आले आहे. गावातील थांबलेली अनेक विकासकामांना चालना देण्यासाठी मयेकर यांचा धाडसी निर्णय योग्यच असून या निर्णयाने बांदिवडे गावात विकासाची गंगा येईल असे चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले आहे.
मालवण तालुक्यातील युवा संघटना मजबुतीसाठी निलेश राणे व शिवसेनाप्रमुख जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्ष, मयेकर यांच्यावर नक्कीच महत्वाची जबाबदारी देईल असा विश्वास देखील चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केला आहे.