आ. नितेश राणे हेच या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार नितेश राणे यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण – घाडीवाडीतील उबाठा सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, २५ ऑक्टोबर रोजी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या विकासाची कल्पना पाहता, या गावचा सर्वांगीण विकास तेच करू शकतील हे पटल्याने आपण भाजपामध्ये येऊन त्यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यासाठी विद्यमान सरपंच किरण मेस्त्री, माजी सरपंच सत्यवान भोगले यांनी अथक मेहनत घेतली.
गावठण – घाडीवाडी येथील माजी सरपंच दिपाली घाडी, कौस्तुभ घाडी, प्रदीप घाडी, दयानंद घाडी, मारुती घाडी, विकास घाडी, अशोक घाडी, प्रकाश घाडी, सुनील घाडी, दत्तात्रय दत्ताराम घाडी, एकनाथ घाडी, संतोष घाडी, रविकांत घाडी, प्रवीण घाडी, अनंत घाडी, तुकाराम घाडी, प्रियंका घाडी, सुगंधा घाडी, अनिता घाडी, प्रवीणा घाडी, सविता घाडी, राजश्री घाडी, सुरेखा घाडी, सुप्रिया घाडी, स्नेहा घाडी, समिधा घाडी, अर्चना घाडी, संगीता घाडी, दर्शना घाडी, शुभांगी घाडी, अश्विनी गांवकर, महेश घाडी, वासुदेव गावकर, अनंत घाडी, सुनिता गावकर, दिक्षिता घाडी, प्रतीक्षा घाडी, वंदना घाडी, सुचिता घाडी, दक्षता घाडी, आरती घाडी, मनोरमा घाडी, रविकांत घाडी, रवींद्र गावकर, किशोरी घाडी, तनवी घाडी, प्रणय घाडी, सिद्धेश घाडी, मनीष घाडी, तुषार घाडी, तेजस घाडी, बापू घाडी यांनी प्रवेश घेतला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदिप साटम, मंगेश लोके, देवगड तालुका युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, भाजपा देवगड तालुकाध्यक्ष राजू शेट्टे, सरपंच किरण मेस्त्री, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ. सावी लोके, मंडल अध्यक्ष उषःकला केळुस्कर, महिला तालुका उपाध्यक्ष सौ. श्वेता शिवलकर, देवगड शहर अध्यक्षा तन्वी शिंदे, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर, ग्रा. पं. सदस्य सुनील कांडर, सुदर्शन साळकर, वसंत पवार, हडपिड चे माजी सरपंच दाजी राणे, माजी सरपंच संतोष साळसकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण राणे, विजय परब, सिद्धेश भोगले उपस्थित होते.