कुडाळ | ब्युरो न्यूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिचा खून केल्याची घटना कुडाळ तालुक्यात भडगाव – धनगरवाडी येथे घडली. सौ. रेणुका उर्फ रेश्मा ओमप्रकाश सिंह वय ( ४२ वर्षे, रा. नेरुर कवीलगाव, कुडाळ, मूळ राहणार आंबाटोला तालुका- टेरपा, जिल्हा – पत्रातू, राज्य झारखंड) असे या महिलेचे नाव असून तिचा पती ओमप्रकाश बंधन सिंह (वय ४२ वर्षे, सध्या राहणार भडगाव तालुका- कुडाळ, मुळ रा. आंबाटोला तालुका- टेरपा , जिल्हा – पत्रातू, राज्य झारखंड) याने तिला मारल्याचा पोलिसाना संशय आहे. दि. १३ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८.४५ ते दि. १५ ऑक्टोबर पहाटे ४.४८ या मुदतीत ही घटना घडल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.
दरम्यान संशयित ओमप्रकाश सिंह हा पळून गेला असून त्याचे मोबाईल लोकेशन मुंबई येथे मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी कुडाळ पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे व अधिक तपास सुरु आहे.