बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे गांधी जयंती व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी.
मसुरे | प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी दिपक भोगटे यांनी संबोधीत करताना सांगितले की अंहिसक स्वातंत्र्यलढा हे गांधीच्या स्वातंत्र्य लढ्याचे वैशिष्ट्य होते. आजही महात्मा गांधीना जगभरात अत्यंत आदराचे स्थान आहे. १९२० ते १९४७ एकूण २७ वर्षे महात्मा गांधीनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करून अहिंसक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
लालबहादूर शास्त्री हे गांधीवादी विचारवंत होते. त्यांचे सारे जीवन म. गांधी यांच्या प्रमाणेच अत्यंत साधे होते. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर भारताचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढ्यात त्यानी कणखर भूमिका घेऊन भारताला विजय मिळवून दिला. अशा या थोर नेत्यांचे लोकशाहीवादी समतावादी अहिंसक विचार, साधी राहाणी सर्वानी अंगिकारावी असे आवाहन दीपक भोगटे यांनी केले.
या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, काळसेकर सर, विद्या चिंदरकर, रिया जांभवडेकर, बाळकृष्ण गोंधळी व विद्यार्थी उपस्थित होते.