28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

साळशी हायस्कूलला माजी विद्यार्थ्याकडून ३० खुर्च्यांची देणगी.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर तथा साळशी हायस्कूलच्या एस. एस. सी. मार्च २००३ च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेस सुमारे १२ हजार रुपये किंमतीच्या ३० प्लॅस्टिक खुर्च्या देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आल्या. हा खुर्च्या प्रदानाचा कार्यक्रम प्रशालेत संपन्न झाला. यावेळी सन- २००३ च्या माजी विद्यार्थ्यांनी – ३० प्लास्टिक खुर्च्या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांच्याकडे सुपूर्द केल्या .यावेळी माजी विद्यार्थी निलेश लाड यांने मनोगत व्यक्त केले.

सहा. शिक्षक संजय मराठे व पुरुषोत्तम साटम यांनी ही माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. प्रशालेचे मुख्या‌ध्यापक माणिक वंजारे यांनी सन २००३ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले. गांवच्या ठिकाणी राहून आपल्या तुटपुंज्या आर्थिक प्राप्तीतून आपल्या प्रशालेसाठी कांही तरी करण्याची हे धडपड करतात, ही त्यांची शाळेविषयी आस्था पाहून त्यांचा अभिमान वाटतो. असे कौतुकोदगार काढले. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशाला, संस्था, शिक्षक या सर्वांच्या वतीने या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्नील भरणकर यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रम समारोप केला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी- निलेश लाड, सौ. श्रेया धुळप, उमेश नाईक, कृष्णा सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहा.शिक्षक संजय मराठे , पुरुषोत्तम साटम व स्वप्नील भरणकर, भिसे व प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर तथा साळशी हायस्कूलच्या एस. एस. सी. मार्च २००३ च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेस सुमारे १२ हजार रुपये किंमतीच्या ३० प्लॅस्टिक खुर्च्या देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आल्या. हा खुर्च्या प्रदानाचा कार्यक्रम प्रशालेत संपन्न झाला. यावेळी सन- २००३ च्या माजी विद्यार्थ्यांनी - ३० प्लास्टिक खुर्च्या प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे यांच्याकडे सुपूर्द केल्या .यावेळी माजी विद्यार्थी निलेश लाड यांने मनोगत व्यक्त केले.

सहा. शिक्षक संजय मराठे व पुरुषोत्तम साटम यांनी ही माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याबद्दल कौतुकोद्गार काढले. प्रशालेचे मुख्या‌ध्यापक माणिक वंजारे यांनी सन २००३ च्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले. गांवच्या ठिकाणी राहून आपल्या तुटपुंज्या आर्थिक प्राप्तीतून आपल्या प्रशालेसाठी कांही तरी करण्याची हे धडपड करतात, ही त्यांची शाळेविषयी आस्था पाहून त्यांचा अभिमान वाटतो. असे कौतुकोदगार काढले. त्यांच्या या कार्याबद्दल प्रशाला, संस्था, शिक्षक या सर्वांच्या वतीने या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वप्नील भरणकर यांनी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रम समारोप केला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम साटम यांनी केले.

या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी- निलेश लाड, सौ. श्रेया धुळप, उमेश नाईक, कृष्णा सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहा.शिक्षक संजय मराठे , पुरुषोत्तम साटम व स्वप्नील भरणकर, भिसे व प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!