तळगांवचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात…!
कुडाळ | ब्युरो न्यूज : रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगांवातील उपसरपंचांसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे प्रवेश केला . हा प्रवेश तळगांव उबाठा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
मालवण तालुक्यातील तळगांव येथील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची कुडाळ येथील भाजप कार्यालय येथे भेट घेतली आणि गेल्या दशकात तळगांवचा कोणत्याही प्रकारचा विकास झाला नसल्याची प्रतिक्रिया देऊन गावातील प्रत्येक वाडीत विकासगंगा आली पहिजे अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी करून भाजपमध्ये प्रवेश केला.हा प्रवेश भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे
यावेळी तळगांव उपसरपंच संतोष पेडणेकर, जयवंत दळवी, चारुहास दळवी, मुरारी टेमकर, तळेगाव ग्रामपंचायत सदस्य श्वेता पेडणेकर, धोंडी दळवी, सुरेंद्र दळवी, एकनाथ तळगांवकर, केशव सहदेव तळगांवकर, अशोक दळवी, केशव तळगांवकर, विजय राऊळ, अशोक दळवी, राजू सावंत, महेश फाले, अरुण वालावलकर, सुधाकर तळगावकर, राजू राणे, सागर फाले यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साहिल, भाजप प्रदेश सदस्य संध्या तेरसे, जगदीश चव्हाण, निलेश तेंडोलकर, विजय कांबळी आदी उपस्थित होते.यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षांमध्ये तळगाव गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही म्हणूनच यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या गावाचा विकास आम्ही निश्चित करून त्यांना अपेक्षित असलेला गावचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यांना कधीही निराश होऊ देणार नाही माजी खासदार विनायक राऊत यांना आपल्या गावात साधा विकास निधी आणता आला नाही म्हणूनच त्यांच्या पक्षातील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले