26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणच्या इशांत वेंगुर्लेकर आणि लौकिक तळवडेकर यांची राज्य स्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : डेरवण येथे १८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस २०२४/२५ स्पर्धेत मालवण टोपीवाला हायस्कूल मधील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कु. इशांत वेंगुर्लेकर याची १७ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कु. लौकिक तळवडेकर याची १४ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.

हे दोघेही २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत परभणी येथे राज्य स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या सांघिक गटामध्ये जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण चा लौकिक तळवडेकर, योगेश परुळेकर, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल यशस्वी स्पर्धक आणि प्रशिक्षक चंद्रकांत साळवे यांची प्रशंसा होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : डेरवण येथे १८ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस २०२४/२५ स्पर्धेत मालवण टोपीवाला हायस्कूल मधील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कु. इशांत वेंगुर्लेकर याची १७ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण मध्ये इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कु. लौकिक तळवडेकर याची १४ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये राज्य पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली.

हे दोघेही २३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत परभणी येथे राज्य स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या सांघिक गटामध्ये जय गणेश इंग्लिश स्कूल मालवण चा लौकिक तळवडेकर, योगेश परुळेकर, प्रज्वल नामनाईक, दीक्षांत शिवापूरकर यांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल यशस्वी स्पर्धक आणि प्रशिक्षक चंद्रकांत साळवे यांची प्रशंसा होत आहे.

error: Content is protected !!