28.1 C
Mālvan
Wednesday, September 18, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

रिक्षा तसेच परवानाधारक व्यावसायिकांच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी ऑनलाईन ऍप प्रदर्शित करायला पर्यटन महासंघास सहकार्य करायचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आश्वासन.

मालवण | प्रतिनिधी : पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने २७सप्टेंबर रोजी होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा व्यासायिकांना संघटित करून त्यांच्या ऑनलाईन व्यवसाय वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी ऑनलाईन ऍप सुरु करण्याचे ठरले आहे. यासाठी श्री विजय काळे (उपपरिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग) यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेण्यात आली. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने रिक्षा व अन्य परवाना धारक व्यावसायिकांना ऍप च्या माध्यमातून रजिस्टर केल्यास, या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल यासाठी भेट घेण्यात आली.

शासन, व्यावसायिक तसेच पर्यटन महासंघाच्या समन्वयाने ऍप चालल्यास पर्यटन वाढीसाठी जिल्ह्यात परिवहन पर्यटन क्षेत्रात योग्य मार्ग बनेल अशी भूमिका पर्यटन व्यावसायीक महासंघा तर्फे मांडण्यात आली. यावेळी बोलताना श्री. विजय काळे यांनी पर्यटन पर्यटन महासंघाच्या या उपक्रमाच्या माहिती साठी रिक्षा संघटना तसेच अन्य परवानाधारक वाहतूक व्यावसायिकांची चालू आठवड्यात आपल्या दालनात ओरोस येथे बैठक आयोजित करून या साठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ह्या ऍप साठी साठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन २८ वर्षे पूर्ण होऊनही जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत.जिल्ह्यतील ग्रामीण पर्यटन वाढीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही रिक्षा व्यावसायिकांची असूनही ऑनलाईन मार्केटिंग क्षेत्रात रिक्षा व्यावसायिक मागे राहिल्याने परवानाधारक रिक्षा व्यावसायिक पर्यटन व्यवसाया पासून दुरावल्या स्थितीत आहे याचाच विचार करून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिक ऑनलाईन ऍप च्या माध्यमातून नोंदणीकृत केल्यास जिल्ह्यात पर्यटनासाठी भेट देणाऱ्या देशविदेशातील पर्यटकांसाठी व्यावसायिकांचे नंबर उपलब्ध होऊन येणाऱ्या पर्यटकांना परिचित ,अपरिचित पर्यटन स्थळे पाहण्याचे नियोजन करता येईल तसेच पर्यटन स्थळ दरपत्रकही उपलब्ध होईल व सुरक्षित प्रवासाचे माध्यम उपलब्ध होऊन जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होणारी आहे अशी माहिती विष्णू मोंडकर (अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ) यांनी दिली. यावेळी किशोर दाभोलकर ( सोशल मीडिया अध्यक्ष, पर्यटन व्यावसायिक महासंघ) टी टी डी एस अध्यक्ष सहदेव साळगावकर, टीटीडीएस कार्याध्यक्ष रविंद्र खानविलकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, रामा चोपडेकर, मिलिंद झाड, मनोज खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!