पालकांच्या नियंत्रणाखालीच अवलंबून असेल इन्टाग्रामवरील वावर.
ब्युरो न्यूज : मेटाने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी पॉलिसी आणली असून १८ वर्षे वयाखाली युजर्ससाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. पालकांच्या नियंत्रणाखाली किशोरवयीन मुलांना त्यांचे इन्स्टाग्राम खाते वापरता येणार आहे.
सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे.
याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे मेटा अकाऊंट्स ‘टीन अकाऊंट्स’वर पोर्ट करण्यात येणार आहेत. ही डिफॉल्ट खासगी खाती असणार आहेत. या खात्यातून केवळ फॉलो केलेल्या किंवा आधीपासून कनेक्ट असेलल्या अकाऊंट्सवरुन मेसेज येऊ शकतात.
१६ वर्षांखालील मुलं केवळ पालकांच्या परवानगीने डिफॉल्ट सेटिंग्ज बदलू शकतात. आपली मुलं कुणाशी बोलतात, कुणाला फॉलो करतात यावर पालकांना नियंत्रण ठेवता येणार आहे. सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी मेटाने अनेक बदल केले आहेत.
मेटासह, गुगल युट्यूब, टीक टॉक अशा अशा सोशल मीडिया अॅप्सना जरभरात अनेक खटल्यांना सामोरं जावं लागत आहेत. शाळा, महाविद्यालये, संस्था आणि पालकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे मेटाने एक पाऊल पुढे टाकत या नवीन सेटिंग्ज आणल्या आहेत.
जुलै महिन्यामध्ये यूएस सिनेटने दोन ऑनलाईन सुरक्षा विधेयके आणले आहेत. यामध्ये द किड्स ऑनलाईन सेफ्टी अ
ॲक्ट आणि द चिल्ड्रन अँड टीन्स ऑनलाईन प्रायव्हसी या दोन कायद्यांचा समावेश आहे. या कायद्यान्वये मुलांवर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सोशल मीडिया कंपनीवर निश्चित करण्यात येणार आहे.
मेटाच्या नवीन बदलांनुसार १८ वर्षांखालील युजर्सना प्रत्येक दिवशी ६० मिनिटांनंतर ॲप बंद करण्याचं सूचित केलं जाईल. याशिवाय ही खाती डिफॉल्ट स्लीप मोडवर जातील आणि रात्रभर कुठलेही नोटिफिकेशन्स येणार नाहीत. सुरुवातीला इन्स्टाग्रामवर या सेटिंग्ज येणार आहेत.