संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत करणार मार्गदर्शन ; माजी खासदार सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : नुकतीच मसुरे भरतगड येथे स्थापना झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या वतीने तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार मार्गदर्शन कार्यक्रमा अंतर्गत ‘मी उद्योजक होणार’ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. १० सप्टेंबर रोजी मालवण वायरी येथील आर. जी. चव्हाण सभागृह येथे हा विनामूल्य मार्गदर्शन कार्यक्रम, सकाळी १० ते १ दरम्यान संपन्न होणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत हे या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार असून माजी खासदार सुरेश प्रभू यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
.९९६७७५०७३२ आणि ८४५९४९२१८० या क्रमांकांवर संपर्क साधून याविषयी अधिक माहिती घेण्याची माहिती देण्यात आली आहे.