सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या या घरांच्या किंमतीकडे. या अर्जामध्ये त्या किंमतीही दिल्या आहेत. किंमती पाहील्यानंतर किती जणांचे स्वप्नातल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार याचाच विचार अनेक जण करत आहेत.
नवी मुंबई:
गोपाळकाल्याच्या शुभ मुहूर्तावर सिडको गृहसंकुलांतील उपलब्ध 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा आज कृष्ण जन्माष्टमीला सुरूवात करण्यात आली. त्यातून 900 हून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. ज्यांना ही घरं हवी आहेत त्यासाठी आजपासून अर्ज दाखल करता येणार आहे. मात्र सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या या घरांच्या किंमतीकडे. या अर्जामध्ये त्या किंमतीही दिल्या आहेत. किंमती पाहील्यानंतर किती जणांचे स्वप्नातल्या घराचं स्वप्न पूर्ण होणार याचाच विचार अनेक जण करत आहेत.
( Aapli Sindhunagari’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सोमवार, 27 ऑगस्ट 2024 रोजी सिडकोच्या नवी मुंबईतील गृहसंकुलांतील एकूण 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. एकूण 902 सदनिकांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या विकसित नोडमधील 213 आणि सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती व वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील 689 सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी – मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचं बक्षीस
सिडकोतर्फे सातत्याने विविध उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. या वर्षीच्या गोपाळ काल्याच्या मुहूर्तावर उपलब्ध 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधील उपलब्ध 213 सदनिकांपैकी 38 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 175 सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. तसेच सिडकोच्या खारघर येथील व्हॅलीशिल्प, स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहा-सेलिब्रेशन गृहसंकुलांतील उपलब्ध 689 सदनिकांपैकी 42 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता, 359 सदनिका अल्प उत्पन्न गटाकरिता, 128 सदनिका मध्यम उत्पन्न गटाकरिता आणि 160 सदनिका या उच्च उत्पन्न गटाकरिता उपलब्ध आहेत.