आरोपींवर कडक कारवाई करा- डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब देवगड तालुका अध्यक्ष डॉ. सतीश लिंगायत व तालुका सेक्रेटरी डॉक्टर स्वप्नील शिंगाडे यांची मागणी मागणी.
नवलराज काळे |
शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी देवगड डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब तर्फे सर्व वैद्यकीय व्यावसायिक दवाखाने व इस्पितळे बंद ठेवून कोलकाता येथे झालेल्या स्त्री डॉक्टरच्या बलात्कार व खून प्रकरणी निषेध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला 100% पाठिंबा दिला. देवगड तालुक्यात सहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या बंदला पाठिंबा देण्यात आला.
दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी कोलकत्ता येथील टू जी कार हॉस्पिटल मध्ये 36 तासांची ड्युटी करून थोडीशी विश्रांती घेण्यासाठी गेलेल्या मेडिसिन विभागाच्या विद्यार्थिनी असलेल्या महिला डॉक्टरचा अत्यंत घृणास्पद तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे वैद्यकीय व्यवसायिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याचा तीव्र निषेध दर्शवण्यासाठी देशातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व डॉक्टर्स यांनी शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी कडकडीत बंद पुकारला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब या डॉक्टर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देवगड तालुक्यातील सर्व डॉक्टर याने आपली वैयक्तिक दवाखाने बंद ठेवून कोलकत्ता येथील घडलेल्या घटनेच्या जाहीर निषेध केला आहे.डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब देवगड तालुका अध्यक्ष डॉ. सतीश लिंगायत व तालुका सेक्रेटरी डॉक्टर स्वप्नील शिंगाडे यांनी स्त्री डॉक्टर वरती झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमताच सर्व डॉक्टर्स संपावर गेल्याचे निदर्शनास आले.