Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
Ind vs SL 1st ODI: टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पहिल्यांदा टीम इंडियाच्या सूर्या सेनेने श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. तर 2 ऑगस्टपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वनडे सिरीजला सुरुवात झाली आहे. टी-20 नंतर प्रमुख कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वनडेमध्ये कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच टीम इंडियाचा नवा कोच ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी कसा वागतो याबाबत रोहित शर्माने खुलासा केला आहे.
सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे. रोहित म्हणाला, “गौतम गंभीर याआधी खूप क्रिकेट खेळला आहे आणि कोचपद सांभाळण्यापूर्वी तो फ्रँचायझी टीमशीही जोडला गेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे, हे पूर्वीच्या कोचिंग स्टाफपेक्षा नक्कीच वेगळं असणार आहे. प्रत्येक व्यक्ती भिन्न असतात. पूर्वी जेव्हा राहुल द्रविड टीममध्ये सामील झाला तेव्हा आमच्याकडे रवी शास्त्री होते.”
ड्रेसिंग रूममध्ये कसा असतो गंभीर?
सामन्यादरम्यान गंभीर हसतो की नाही याची काळजी तुम्ही करू नका, असं आवाहनही रोहितने केलं. “गौतम भाई ड्रेसिंग रूममध्ये खूप मजा करतात. तो खूप हसतो. मुळात हे त्याची वैयक्तिक बाब आहे. तो हसेल की नाही हे पाहण्यासाठी आपण त्याच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटत नाही. प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग आहे. तुम्ही खूप हसाल, लोकांना ते आवडणार नाही. त्यामुळे त्यांना काय आवडतं आणि काय नाही हे प्रत्येकाने ठरवायचं आहे.
“रोहित शर्माची तूफानी खेळी
भारत आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवारी कोलंबोमध्ये वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 230 रन्स केले. याला प्रत्युत्तर देताना भारताने चांगली सुरुवात केली. दरम्यान या सामन्यात रोहित शर्मा चांगलाच आक्रामक दिसून आला. यावेळी अवघ्या 33 बॉल्समध्ये रोहितने अर्धशतक पूर्ण केलं.