कणकवली | उमेश परब : कणकवली तालुक्यातील असलदे बौद्धवाडी येथील शैलेश संजय तांबे ( २८ ) या रेल्वे कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. शैलेश तांबे हा असलदे बौद्धवाडी येथे राहत होते. सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास त्याने प्लास्टिक कॅनमधून तीन ते चार लिटर पेट्रोल बरोबर घेतले. तसेच घरापासून दोन ते तीन किलोमीटर लांब असलेल्या शेतातील मांगराजवळ ते गेले. तिथे त्याने आपल्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेतले. त्यातच त्याचा भाजून मृत्यू झाला आहे.
तसेच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, हवालदार राहुल तुळसकर,
सरपंच पंढरी वायंगणकर ,असलदे पोलिस पाटील पाताडे,पोलीस हवालदार ममता जाधव,उपसरपंच संतोष परब , कोतवाल मिलिंद तांबे आदींचे पथक दाखल झाले.त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.