क्रीडा | ब्युरो न्यूज : भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने देखील टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता रविंद्र जडेजा याने ही घोषणा केली आहे. आपण नेहमीच देशासाठी समर्पित खेळाचे योगदान दिलेले असून, टी ट्वेंटी विश्वचषकात विजयी झाल्यानंतर त्या प्रकारातून निवृत्त होणे हिच योग्य वेळ असल्याचे जाडेजाने सांगितले आहे.
रवींद्र जाडेजाचा हा निर्णय म्हणजे भारताचा मुख्य क्रिकेट प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर याची चाहुल लागल्याने हा निर्णय घेतला गेला आहे अशा प्रतिक्रिया विविध डिजीटल क्रीडा मंचांवर काही जणांनी व्यक्त केल्या आहेत.