सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि मान्यवरांनी काॅम्रेड मॅरॅथाॅनसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॅरॅथॉन धावक ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांना दिल्या शुभेच्छा.
सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजीत ‘ऑल दि बेस्ट’ रनला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ९ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत (दरबान – माॅरिट्झबर्ग) संपन्न होणार्या काॅम्रेड मॅरॅथाॅन २०२४ साठी सिंधुदुर्गातील सावंतवाडीचे मॅरॅथॉन धावक ओंकार पराडकर व कुडाळ येथील प्रसाद कोरगांवकर यांची भारतीय मॅरॅथाॅन संघात निवड झाली आहे. हे दोन्ही धावक, ६ जूनला द. आफ्रिकेला रवाना होत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधु रनर्स, रांगणा रनर्स व PAWS ( सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलिस्टस संस्था) यांनी एकत्रित येऊन, शुभेच्छा देण्यासाठी ही विशेष अशी ‘ऑल दि बेस्ट रन’ आयोजीत करण्यात आली होती. सावंतवाडी राजवाडा प्रांगणात, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दोन्ही धावकांशी विशेष संवाद साधला आणि त्यांना काॅम्रेड मॅरॅथाॅन साठी शुभेच्छा दिल्या.
आज २ जून रोजी सकाळी ६ वाजता सावंतवाडी राजवाडा येथून ही रन सुरु झाली. मोती तलावाच्या सभोवताली हातात भारतीय तिरंगा ध्वज घेत, जवळपास ६ ते ७ फेर्या धावून या विशेष रनसाठी उपस्थित धावकांनी, ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांना शुभेच्छा दिल्या. राजवाडा प्रांगण प्रवेशद्वार येथे एक केक कापून व तो ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांना भरवून सर्वांनी आनंद सदिच्छा व्यक्त केल्या.
या ‘ऑल दि बेस्ट रन’ साठी युवराज लखमराजे भोसले, धावक ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांच्यासह डाॅ. शंतनु तेंडुलकर, डाॅ. प्रशांत मढव, डाॅ. स्नेहल गोवेकर, डाॅ. मिलिंद खानोलकर, डाॅ. अनीष स्वार, डाॅ. उमेश सावंत, मेघराज कोकरे, मेघराज कोकरे, फ्रॅन्की गोम्स, निखिल तेंडोलकर,भूषण बांदेलकर, भूषण पराडकर, अक्षय बांदेलकर, चार्टर्ड अकाऊंटंट सुप्रिया मोडक, प्रसाद बांदेकर, सुजाता रासकर, प्रकाश चव्हाण, नझ़ीर बेग, सुधीर पराडकर, शुभदा रेडकर, सोनाली पराडकर, सिद्धार्थ पराडकर, प्रज्योत राणे, संजय गावडे, प्रथमेश कदम, कु. श्रावणी रेडकर, कु. शुभ्रा रेडकर, कु. श्लोक पराडकर आणि मान्यवर, क्रीडा प्रेमी तसेच हीतचिंतक उपस्थित होते.
डाॅ. सोमनाथ परब, सौ. ओवी ओंकार पराडकर, कु. याज्ञी पराडकर, लक्ष्मण कोरगांवकर व परिवार, बांदेलकर परिवार, दत्तात्रय पराडकर व परीवार, नाईक परिवार यांनी, ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांना दूरध्वनी वरुन तसेच अन्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
‘ऑल दि बेस्ट रन’ च्या समारोप प्रसंगी ओंकार पराडकर व प्रसाद कोरगांवकर यांनी त्यांना प्रोत्साहीत केलेल्या सर्वांचे आभार मानत या विशेष रनसाठी युवराज लखमराजे भोसले आणि सर्व आयोजक व हीतचिंतकांचे आभार मानले.
आजच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस देखिल असल्याने उपस्थित सर्वांच्या वतीने सिंधू रनर्स तर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.