27.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

लोकशाहीची अक्षय्यता मतदानावर आधारलेली आहे म्हणून… ; सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मतदाना विषयी उदासिनतेबद्दल मांडले परखड मत.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी लोकशाहीची अक्षय्यता म्हणजेच लोकशाही टिकण्याविषयी मतदान हाच मूलभूत व अत्यावश्यक मार्ग आहे असे एका प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे. दरम्यान आजही निवडणुका संपन्न होताना विविध यंत्रणा, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांमार्फत मतदानाविषयी व्यापक जनजागृती होऊन देखील मतदानाचा टक्का लक्षणीय असा वाढत नसल्याने त्यांनी खंत वजा संताप व्यक्त केला आहे.

श्री पेडणेकर यांनी ही गोष्ट एक देशव्यापी समस्या असल्याचे सांगत त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हा जो व्यक्ती मतदान करेल त्याला मतदान केल्याचे व्हिजीटींग कार्डसारखे एक छोटेसे प्रमाणपत्र द्यावे आणि ते प्रमाणपत्र पुढील निवडणुकीपर्यंत सर्व शासकीय योजना, सर्व प्रकारचे अनुदान,एस. टी. व रेल्वे प्रवासाच्या सवलती, पाल्याची स्कॅालरशीप, दवाखाना – औषधं सवलती, शेतीवर आधारीत सवलतीआणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयकर तरतुदी नुसांर सर्व वजावटी या सर्वांसाठी आधार कार्डप्रमाणे मतदान कार्ड आवश्यक करायच्या पर्यायाचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. ज्यांच्याकडे मतदान केल्याचे प्रमाणपत्र असेल तोच पुढील पाच वर्ष शासकीय योजनेचा फायदा घेईल अन्यथा नाही अशी कडक व्यवस्था निर्माण करायचीही गरज असल्याचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान एखाद्या ठिकाणी मतदान का होऊ शकत नाही, काही तांत्रिक किंवा दळणवळणाची समस्या आहे का वगैरेची देखील यंत्रणांनी निवडणुकीपूर्वी शहानिशा करायची यंत्रणा विकसीत झाली तर उत्तम होईल असेही ते म्हणाले.

असे झाल्यास एकही मतदार मतदानाची टाळाटाळ करणार नाही आणि उन, वारा, पाऊस एवढेच काय तर स्वतःचे लग्न, अंत्यसंस्कार वगैरेला देखील जाण्यापूर्वी नागरीक आवर्जून मतदानाचा आधिकार बजावतील असा उपरोधीक टोलादेखील पेडणेकर यांनी मतदान न करणार्यांना हाणला आहे. विविध पद्धतीने मतदानाविषयी जागृती करणार्या निर्वाचन तथा निवडणुक आयोगा पर्यंत हे विचार गेले तर मतदानाविषयी उदासीनता दूर झाल्याशिवाय रहाणार नाही अशी आशा सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही अक्षय्य रहावी व त्यासाठी मतदान करणे हा विचार अक्षय्य पणे युगानयुगे टिकवणे ही गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांनी ज्यांनी सजगपणे त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावला आहे व देशात इतरत्र बजावणार आहेत त्यांची पेडणेकर यांनी अभिनंदनीय प्रशंसा देखील केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी लोकशाहीची अक्षय्यता म्हणजेच लोकशाही टिकण्याविषयी मतदान हाच मूलभूत व अत्यावश्यक मार्ग आहे असे एका प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे. दरम्यान आजही निवडणुका संपन्न होताना विविध यंत्रणा, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांमार्फत मतदानाविषयी व्यापक जनजागृती होऊन देखील मतदानाचा टक्का लक्षणीय असा वाढत नसल्याने त्यांनी खंत वजा संताप व्यक्त केला आहे.

श्री पेडणेकर यांनी ही गोष्ट एक देशव्यापी समस्या असल्याचे सांगत त्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हा जो व्यक्ती मतदान करेल त्याला मतदान केल्याचे व्हिजीटींग कार्डसारखे एक छोटेसे प्रमाणपत्र द्यावे आणि ते प्रमाणपत्र पुढील निवडणुकीपर्यंत सर्व शासकीय योजना, सर्व प्रकारचे अनुदान,एस. टी. व रेल्वे प्रवासाच्या सवलती, पाल्याची स्कॅालरशीप, दवाखाना - औषधं सवलती, शेतीवर आधारीत सवलतीआणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयकर तरतुदी नुसांर सर्व वजावटी या सर्वांसाठी आधार कार्डप्रमाणे मतदान कार्ड आवश्यक करायच्या पर्यायाचा विचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. ज्यांच्याकडे मतदान केल्याचे प्रमाणपत्र असेल तोच पुढील पाच वर्ष शासकीय योजनेचा फायदा घेईल अन्यथा नाही अशी कडक व्यवस्था निर्माण करायचीही गरज असल्याचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे म्हणणे आहे. दरम्यान एखाद्या ठिकाणी मतदान का होऊ शकत नाही, काही तांत्रिक किंवा दळणवळणाची समस्या आहे का वगैरेची देखील यंत्रणांनी निवडणुकीपूर्वी शहानिशा करायची यंत्रणा विकसीत झाली तर उत्तम होईल असेही ते म्हणाले.

असे झाल्यास एकही मतदार मतदानाची टाळाटाळ करणार नाही आणि उन, वारा, पाऊस एवढेच काय तर स्वतःचे लग्न, अंत्यसंस्कार वगैरेला देखील जाण्यापूर्वी नागरीक आवर्जून मतदानाचा आधिकार बजावतील असा उपरोधीक टोलादेखील पेडणेकर यांनी मतदान न करणार्यांना हाणला आहे. विविध पद्धतीने मतदानाविषयी जागृती करणार्या निर्वाचन तथा निवडणुक आयोगा पर्यंत हे विचार गेले तर मतदानाविषयी उदासीनता दूर झाल्याशिवाय रहाणार नाही अशी आशा सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही अक्षय्य रहावी व त्यासाठी मतदान करणे हा विचार अक्षय्य पणे युगानयुगे टिकवणे ही गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांनी ज्यांनी सजगपणे त्यांच्या मतदानाचा अधिकार बजावला आहे व देशात इतरत्र बजावणार आहेत त्यांची पेडणेकर यांनी अभिनंदनीय प्रशंसा देखील केली आहे.

error: Content is protected !!