मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देवी पावणाई – भगवती देवालयाचा वर्धापन दिन सोहळा उद्या १ मे रोजी संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदिवडे देवस्थान समिती बांदिवडे यांचेमार्फत करण्यात आले आहे.
सकाळी ०८.३० वा. अभिषेक, १०.०० ते १२.०० श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.०० ते १२.३० निशाण फेरी, दुपारी १२.३० ते ०१.०० आरती, दुपारी १.०० ते ०३.०० महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५.०० स्थानिक सुश्राव्य भजन, सायंकाळी ०५.०० वा. कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बांदिवडे देवस्थान बांदिवडे यांनी केले आहे.