28.7 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

गवंडीवाडा भागात भाजयुमो जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी शौचालय दुरावस्थेची घेतली दखल.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाडा परिसरातील विविध कामांची मांगणी तेथील स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या बूथ क्र. ९५ मधील आढावा बैठकीत मांडली होती. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी पुढाकार घेत मालवण शहरातील गावंडीवाडा परिसरातील मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली होती याकडे मालवण नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत होते. या ठिकाणच्या नागरिकांनी हि बाब भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो अभियान’ तसेच बूथ क्रमांक ९५ मधील बैठकीत जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या कडे मांडली असता त्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. या शौचालायाचा वापर त्या परिसरातील १५ ते २० कुटुंब करत आहेत. सौरभ ताम्हणकर यांनी या ठिकाणाची पाहाणी करत त्या शौचालयाची दुर्दशा तेथील स्थानिक नागरिकांकडून जाणून घेत तात्काळ त्याठिकाणी तुटलेला लाईट स्विच, तुटलेले दरवाजे तर काही दरवाज्यांना तुट्लेली कडी हि तात्काळ उपलब्ध करून देत ते बदलण्याचे कामं सध्या सुरु आहे. त्याच प्रमाणे त्या सौचालयातील विद्युत पुरवता गेले दोन वर्ष खंडित झाला होता त्यावर सौरभ ताम्हणकर यांनी मालवण वीज वितरण विभागाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाहीच्या सूचना केल्या.
त्याचप्रमाणे मालवण गवंडीवडा ते मालवण बाजारपेठ परिसरातील स्ट्रीट लाईट गेले अनेक महिने बंद होते. याची माहिती मिळताच सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपरिषदेशी संपर्क साधतं लाईट उपलब्ध करून घेत तात्काळ कॉन्ट्रॅक्टर तुषार जुवेकर यांच्या सहकार्याने बदलून घेतले.

त्याचप्रमाणे गवंडीवाडा प्रभागातील उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी यावेळी म्हंटले आहे. नागरीकांनी सौरभ ताम्हणकर यांचे आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाडा परिसरातील विविध कामांची मांगणी तेथील स्थानिक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या बूथ क्र. ९५ मधील आढावा बैठकीत मांडली होती. भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी पुढाकार घेत मालवण शहरातील गावंडीवाडा परिसरातील मालवण नगरपरिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली होती याकडे मालवण नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत होते. या ठिकाणच्या नागरिकांनी हि बाब भारतीय जनता पार्टीच्या 'गाव चलो अभियान' तसेच बूथ क्रमांक ९५ मधील बैठकीत जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या कडे मांडली असता त्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली. या शौचालायाचा वापर त्या परिसरातील १५ ते २० कुटुंब करत आहेत. सौरभ ताम्हणकर यांनी या ठिकाणाची पाहाणी करत त्या शौचालयाची दुर्दशा तेथील स्थानिक नागरिकांकडून जाणून घेत तात्काळ त्याठिकाणी तुटलेला लाईट स्विच, तुटलेले दरवाजे तर काही दरवाज्यांना तुट्लेली कडी हि तात्काळ उपलब्ध करून देत ते बदलण्याचे कामं सध्या सुरु आहे. त्याच प्रमाणे त्या सौचालयातील विद्युत पुरवता गेले दोन वर्ष खंडित झाला होता त्यावर सौरभ ताम्हणकर यांनी मालवण वीज वितरण विभागाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाहीच्या सूचना केल्या.
त्याचप्रमाणे मालवण गवंडीवडा ते मालवण बाजारपेठ परिसरातील स्ट्रीट लाईट गेले अनेक महिने बंद होते. याची माहिती मिळताच सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपरिषदेशी संपर्क साधतं लाईट उपलब्ध करून घेत तात्काळ कॉन्ट्रॅक्टर तुषार जुवेकर यांच्या सहकार्याने बदलून घेतले.

त्याचप्रमाणे गवंडीवाडा प्रभागातील उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असे भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी यावेळी म्हंटले आहे. नागरीकांनी सौरभ ताम्हणकर यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!