27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ३ चे विद्यार्थी चमकले….!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवली येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ३ च्या विद्यार्थ्यांनी, सन २०२४ च्या सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता सातवीच्या वरद उदय बाक्रे याने २०० पैकी १५८ गुण प्राप्त करत जिल्हा गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक मिळवला आहे. संतोषी सुशांत साळवे हिने १४६ गुण प्राप्त करत जिल्हा गुणवत्ता यादीत बत्तीसावा क्रमांक मिळवला आहे. इयत्ता सातवीच्या सम्यक चंद्रकांत पुरळकर यांने १३८ गुण मिळवत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे तर इयत्ता सहावीच्या गाथा अमोल कांबळे हिने १२८ गुण आणि अन्वय अच्युत देसाई याने १२४ गुण मिळवून ब्राॅन्झ मेडल प्राप्त केले आहे.

या विद्यार्थ्यांना श्रीमती प्रतिभा कोतवाल व सौ अक्षया राणे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता चौथीचा मयंक रविकांत बुचडे २०० पैकी १६८ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत बत्तीसावा आला आहे त्याला वर्ग शिक्षिका सौ रूपाली डोईफोडे यांचे मार्गदर्शन मिळाले. इयत्ता तिसरीच्या गौरेश सावंत यांनी २०० पैकी १६८ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ४९ वा क्रमांक मिळवला आहे तर कश्यप विजय वातकर १५४ गुण गोल्ड मेडल, अनामी अमोल कांबळे १४८ गुण सिल्वर मेडल, संस्कृती जयवंत रेवाळे १३२ गुण सिल्वर मेडल, आरोही निलेश गोसावी १३० गुण ब्रांझ मेडल व वैदेही संजय गुरव ११४ गुण ब्रांझ मेडल मिळवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका अश्विनी साटम यांचे मार्गदर्शन लाभले. आहे.

इयत्ता दुसरीच्या हार्दिक सागर राणे हिने २०० पैकी १३० गुण व संस्कार साहेब मोटे याने १२० गुण मिळवून ब्रांझ मेडल प्राप्त केले आहे. त्यांना वर्गशिक्षक श्री निवृत्ती गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अक्षया राणे व शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आहे. शाळेने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश चव्हाण व उपाध्यक्ष सौ सायली राणे तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!