श्री दिगंबर जाधव ,चिंदर … (वाढदिवस विशेष.)
त्रिगुणांचे तीन सोहळे म्हणजे जीवन ही श्री दत्त जाणिव शब्दांत, अलंकारांत उत्तमपणे बसते आणि ती विचार व कृतीत बसवता आली तर ती कर्म ठरते.
त्रिगुणांच्या रस्सीखेचेमध्ये रज़ोगुण आणि तमोगुण बहुतांश सरशी करतात परंतु ज्या मनुष्य देहांत सद्गुणाचा टक्का कुठल्याच कृत्रिम जोडतोडीशिवाय प्रपंचात वाढतो त्याला आपण सत्कर्म म्हणतो.
असे सत्कर्मायोगे जीवन संपन्नता जाणणार्या एका माणसाला मालवण तालुक्यातील चिंदर गांवात दिगंबर जाधव नांवाने लोक ओळखतात..!
श्री गुरुदत्तात्रेयांचे निःस्सिम भक्त असलेले श्री दिगंबर जाधव यांनी
शून्यातून विश्व निर्माण करुन जीवन प्रगतीची कास धरली आहे.
चिंदर भटवाडीतील मोलमजुरी करणाऱ्या शेतकरी कुटुंबात १ नोव्हेंबर १९८४रोजी दिगंबर यांचा जन्म झाला. शांत, सुस्वभावी, मनमिळावू असलेल्या दिंगबर यांनी बारावी पर्यंत शिक्षण घेऊन एक लहानसे दुकान अतिशय तुटपुंज्या भांडवलात सुरु केले. दरम्यानच्या काळात राजकीय गुरु श्री धोंडी चिंदरकर यांच्या मार्गदर्शन व सहवासाने रामेश्वर.वि.वि.से.सो.ली चिंदर सोसायटीचे चेअरमनपद प्राप्त झाले आणि या संधीचे सोने करत सोसायटी जिल्ह्यात अग्रेसर केली.
काही कालावधी नंतर त्यांनी ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यभार हाती घेतला.गेली दहा वर्षे ते रोजगार सेवक म्हणून काम करत आहेत त्यातुन फळबाग,बांबू लागवड, शौचालये, शेततळे, विहिरी, रस्ते अशी कामे यातुन मंजुर करुन घेऊन मार्गी लावली, त्याच बरोबर दिव्यांग,विधवा, निराधार, शेतकरी पेन्शन योजना, बांधकाम कारागीर यांचे लाभ मिळवून देण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न केले आहेत.
जीवनाच्या खडतर प्रवासात त्यांचे पत्नी आणि कुटुंब भक्कम पणे सावली बनून उभे राहिले त्यांचे प्रापंचिक गरजेचे किराणा आणि जनरल स्टोअर्स चालविण्यासाठी त्यांना समर्थ साथ करतायत.
कोरोनाच्या पहिल्या टप्यात कोरोना योध्दा बनून वृद्ध व्यक्तीची औषधे तालुक्याहून आणून देणे, भाजीपाला, किराणामाल घरपोच करण्याचे त्यांनी काम केले. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे व परदुःख निराकरण हे त्यांचा स्थायीभाव आहेत. अशा प्रकारे त्यांच्या वृत्तीतून त्यांचा मित्र परिवारही व्यापक निर्माण झालाय व होतोय.
कुटुंब,समाज व राष्ट्र या त्रिसूत्रीसाठी असाच त्रिगुणात्मक सत्कर्मयोगी श्री दिगंबर जाधव यांच्या रुपात आज आपण आदर्श म्हणून नक्कीच पाहीला जातो यात शंका नाही. अशा या समाजाभिमुख सालस व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त भरपूर सात्विक शुभेच्छा..!
शुभेच्छुक : सुयोग पंडित (मुख्य संपादक), विवेक परब : चिंदर प्रतिनिधी