27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

अवैध मद्य वाहतूकीवर उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : गोवा राज्यातून बांदा – दाणोलीमार्गे सावंतवाडीत बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई  केली. कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या कारवर (एमएच १७ क्यू ०८८०) धडक कारवाई करत  एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.                       या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूच्या एकूण ८९८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सनी सत्यवान पवार (४०, भोमवाडी, कोलगांव) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक डॉ. तडवी, निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे,  के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : गोवा राज्यातून बांदा - दाणोलीमार्गे सावंतवाडीत बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई  केली. कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या कारवर (एमएच १७ क्यू ०८८०) धडक कारवाई करत  एकूण २ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.                       या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूच्या एकूण ८९८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी सनी सत्यवान पवार (४०, भोमवाडी, कोलगांव) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक डॉ. तडवी, निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे,  के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

error: Content is protected !!