25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

मसुरे डांगमोडे येथे भव्य जिल्हास्तरीय पुरुष आणि निमंत्रित  महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने  मसुरे – डांगमोडे रवळनाथ मंदिर येथील  श्रीदेवी भवानी वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक २९ मार्च रोजी  जिल्हास्तरीय पुरुष व महिला निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन डांगमोडे रवळनाथ मंदिर नजीक करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे प्रथम परितोषिक रोख रू ५०००/_, द्वितीय पारितोषिक रोख रू ३०००/_, तृतीय पारितोषिक  रोख रू १५००/_ आणि चतुर्थ परितोषिक रोख रू १५००/_ आणि विजेत्यांना  कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट खेळाडू यांना  रोख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येईल.

स्पर्धा २९ मार्चला रात्री ७ वाजता सुरू होणार असून स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघानी आपली नावे नितीन हडकर मो. ७२४९३५७२३९ किवा दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे मो. ९३७३८५५६४३ येथे संपर्क साधावा असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे  आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे..

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विजेत्यांना मिळणार कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका असोसिएशन यांचा सहकार्याने आणि नवतरुण मित्र मंडळ मसुरे डांगमोडे यांच्या वतीने  मसुरे - डांगमोडे रवळनाथ मंदिर येथील  श्रीदेवी भवानी वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त दिनांक २९ मार्च रोजी  जिल्हास्तरीय पुरुष व महिला निमंत्रित संघाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन डांगमोडे रवळनाथ मंदिर नजीक करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचे प्रथम परितोषिक रोख रू ५०००/_, द्वितीय पारितोषिक रोख रू ३०००/_, तृतीय पारितोषिक  रोख रू १५००/_ आणि चतुर्थ परितोषिक रोख रू १५००/_ आणि विजेत्यांना  कै. शिवाजी गंगाराम ठाकूर स्मृती चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच स्पर्धेमधील उत्कृष्ट चढाई, क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट खेळाडू यांना  रोख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येईल.

स्पर्धा २९ मार्चला रात्री ७ वाजता सुरू होणार असून स्पर्धेत सहभागी सर्व संघांच्या खेळाडूंची भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघानी आपली नावे नितीन हडकर मो. ७२४९३५७२३९ किवा दत्तप्रसाद पेडणेकर मसुरे मो. ९३७३८५५६४३ येथे संपर्क साधावा असे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे  आणि डांगमोडे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे..

error: Content is protected !!