25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

कै. कवयित्री सौ. नलिनी नारायण कुवळेकर स्मृतिनिमित्त स्वरचित वृत्तबद्ध काव्य स्पर्धेची घोषणा.

- Advertisement -
- Advertisement -

ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग साहित्यिक महिला समूह यांचे आयोजन.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, कै. कवयित्री नलिनी नारायण कुवळेकर स्मृतिप्रीत्यर्थ वृत्तबद्ध कविता स्पर्धा जाहीर झाली आहे. ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग साहित्यिक महिला समूह यांचे आयोजन असलेली ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री व कवींसाठी मर्यादित आहे.

या स्पर्धेतील कविता रचना स्वरचित वृत्तबद्ध असावी आणि वृत्तात नसलेली कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. या स्पर्धेत सहभागी कवितांना विषयाचे बंधन नसून कविता या आधी कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध झालेली नसावी किंवा बक्षीस मिळालेली नसावी असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेसाठी कै. सौ.नलिनी नारायण कुवळेकर परिवार पुरस्कृत प्रथम क्रमांकाच्या कवितेसाठी रोख रूपये ५०००/_ , द्वितीय क्रमांकासाठी ३०००/_ आणि तृतीय क्रमांकासाठी २०००/_ अशी ३ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

या स्पर्धेसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल आणि १३ मे रोजी या स्पर्धेच्या निकालांची घोषणा होणार आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाबद्दल आयोजकांच्यावतीने संबंधितांना नंतर कळवले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी कविता पाठवण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२४ तारीख असून त्यानंतर आलेली कविता स्वीकारता येणार नाही अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

कविता स्वहस्ताक्षरात लिहून सौ. संपदा सुधीर प्रभुदेसाई भवानी अपार्टमेंट, ए विंग, दुसरा मजला, पाकळे हाॅस्पिटल नजिक, नाथ पै नगर, मु. पो. ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग ४१६६०२, (मोबाईल क्र. ८८०६७२५३०३) या पत्त्यावर पाठवाव्यात अशी माहिती आयोजक ऐलमा पैलमा अक्षरदेवा, सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह यांनी दिली आहे.

या स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी वैशाली पंडित ९४२२०४३०२५, (सदस्य, ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!