25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

आचरा येथे शिमगोत्सव २०२४ निमित्त जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडो येथील श्री देव चव्हाटा रंगमंच येथे ३० मार्चला जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिमगोत्सव २०२४ निमित्त आयोजित ही स्पर्धेची वेळ रात्री १०:३० वाजता असून मधलालाडा ग्रामस्थसभा आचरे पिरावाडी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रुपये ७०००/_ व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ५०००/_ व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये २०००/_ व आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये २००/_ आहे.

स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.
१) स्नर्धेसाठी निवडलेल्या गाण्याची वेळ ७ मिनिटे पेक्षा जास्त असावी.
२) स्पर्धेतील एका संघामध्ये कमितकमी ६ व जास्तीत जास्त १५स्पर्धक असावेत.
३) स्पर्धक संघांनी स्पर्धेच्या ठिकाणी ३० मार्च २०२४ ला रात्री ९ वाजता हजर रहावे.
४) सादरीकरणाचे क्रमांक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चिठ्ठी पद्धतीने काढण्यात येतील.
४) श्री देव चव्हाटा हे पवित्र स्थान असल्याने त्याचे स्थानमहात्म्य जपून स्पर्धकांनी त्या स्थानाच्या पवित्रतेला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचे नृत्य सादरीकरण करावे.
६) स्पर्धेविषयी परीक्षकांनी दिलेला निकाल अंतिम राहील.
७) स्पर्धेच्या नियोजनामध्ये आयत्या वेळी बदल करण्याचे अधिकार आयोजक तथा मंडळाचे राहतील.

स्पर्धक संघांनी त्यांची नांव नोंदणी श्री विठ्ठल धुरी ( मोबा. ९३०९८५४५८३) व श्री. संतोष जोशी ( मोबा. ७७९८७३६५१६) या क्रमांकावर संपर्क साधून करावी असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा पिरावाडो येथील श्री देव चव्हाटा रंगमंच येथे ३० मार्चला जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिमगोत्सव २०२४ निमित्त आयोजित ही स्पर्धेची वेळ रात्री १०:३० वाजता असून मधलालाडा ग्रामस्थसभा आचरे पिरावाडी यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रुपये ७०००/_ व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी रुपये ५०००/_ व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये २०००/_ व आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये २००/_ आहे.

स्पर्धेचे नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.
१) स्नर्धेसाठी निवडलेल्या गाण्याची वेळ ७ मिनिटे पेक्षा जास्त असावी.
२) स्पर्धेतील एका संघामध्ये कमितकमी ६ व जास्तीत जास्त १५स्पर्धक असावेत.
३) स्पर्धक संघांनी स्पर्धेच्या ठिकाणी ३० मार्च २०२४ ला रात्री ९ वाजता हजर रहावे.
४) सादरीकरणाचे क्रमांक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चिठ्ठी पद्धतीने काढण्यात येतील.
४) श्री देव चव्हाटा हे पवित्र स्थान असल्याने त्याचे स्थानमहात्म्य जपून स्पर्धकांनी त्या स्थानाच्या पवित्रतेला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचे नृत्य सादरीकरण करावे.
६) स्पर्धेविषयी परीक्षकांनी दिलेला निकाल अंतिम राहील.
७) स्पर्धेच्या नियोजनामध्ये आयत्या वेळी बदल करण्याचे अधिकार आयोजक तथा मंडळाचे राहतील.

स्पर्धक संघांनी त्यांची नांव नोंदणी श्री विठ्ठल धुरी ( मोबा. ९३०९८५४५८३) व श्री. संतोष जोशी ( मोबा. ७७९८७३६५१६) या क्रमांकावर संपर्क साधून करावी असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!