कणकवली | ब्यूरो न्यूज : माऊली मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने १७ मार्चला कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता मोहीम संपन्न झाली. माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या मोहिमेला माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करंबेळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वैयक्तिक, सामाजिक आरोग्य आणि स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. यंत्रणांमध्ये स्वच्छता दूतांची संख्या आणि सध्या निर्माण होणारा कचरा यांच्या प्रमाणात प्रचंड तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी यंत्रणांमधील वरीष्ठांनी सामाजिक कार्यकर्ते व मंडळांना विविध मोहिमेत मार्गदर्शन करावे असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, सुभाष गोविंद उबाळे, सी.आर चव्हाण, निलेश निखार्गे, नामदेव मोडक, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रशांत पाताडे,प्रभाकर कदम, उदय मालप प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर हनुमंते ,परिसेविका प्रिया कदम, औषध निर्माता प्रीती कोरगावकर ,कक्षसेवक सचिन तांबे, सुरक्षारक्षक अमित परब,आदि उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्वच्छता मोहीम आरोग्य विभागाच्या ठिकाणी राबवली. आमची स्वच्छता मोहीम होती.ती श्री.तावडे याच्या संकल्पनेतून जिल्हा आरोग्य केंद्राच्या परिसरात राबवली आणि आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवली ती जिल्यातील ही मोहिम आहे. अशीच स्वच्छता मोहीम जेवढी आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी राबविणार असल्याचा मानस आहे. डाॅ. हनुमंते यांनी माऊली मित्र मंडळाच्या वतीने आज सकाळपासून ४ तास कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरातील स्वच्छता केली त्याबद्दल आभार मानले.