26.2 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने दिपावली निमित्त बांदा शहर मर्यादित किल्ले बनविणे स्पर्धा..!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा : राकेश परब : येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिपावली निमित्त खास बच्चे कंपनीसाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख १०००, ७५० व ५०० रुपये तसेच उत्तेजनार्थ क्रमांकाला रोख ३०० रुपये पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या पर्यावरणपूरक साहित्य वापरून स्पर्धकांनी आपल्या घरासमोर प्रतिकृती तयार करून स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. ही स्पर्धा बांदा शहरासाठी मर्यादित असून यामध्ये १५ वर्षांवरील मुला-मुलींना स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धकांनी आपली नावे ५ नोव्हेंबर पर्यंत जगन्नाथ सातोसकर, तुळशीदास धामापूरकर किंवा गुरुनाथ नार्वेकर यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे परीक्षण ६ व ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा : राकेश परब : येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिपावली निमित्त खास बच्चे कंपनीसाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना रोख १०००, ७५० व ५०० रुपये तसेच उत्तेजनार्थ क्रमांकाला रोख ३०० रुपये पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या पर्यावरणपूरक साहित्य वापरून स्पर्धकांनी आपल्या घरासमोर प्रतिकृती तयार करून स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. ही स्पर्धा बांदा शहरासाठी मर्यादित असून यामध्ये १५ वर्षांवरील मुला-मुलींना स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धकांनी आपली नावे ५ नोव्हेंबर पर्यंत जगन्नाथ सातोसकर, तुळशीदास धामापूरकर किंवा गुरुनाथ नार्वेकर यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे परीक्षण ६ व ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!