मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव आज २ फेब्रुवारी २०२४ ला सुरु झाला असून समस्त आंगणे कुटुंबियांच्या वतीने भाविक भक्तांचे स्वागत करण्यात येत आहे. या दरम्यान यात्रोत्सवासाठी प्रमुख मार्गदर्शन पर माहितीही जाहीर करण्यात आल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.
१) सर्वांनी देवीचे दर्शन रांगेत घ्यावे. २) सर्व रांगांतून देवीचे दर्शन व ओट्या स्विकारण्याची व्यवस्था आहे. ३) आज २ मार्चला पहाटे ३ ते रात्री ९ : ३० ओट्या भरण्यात येतील. रात्री ९:३० ते १२:३० धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर पुन्हा ओट्या भरता येतील. ४) उद्या ३ मार्चला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ओट्या भरणे व नवस फेडता येणार आहेत.
आंगणे कुटुंबियांच्या देवस्थान मंडळ अध्यक्ष श्री. भास्कर आंगणे यांनी जत्रोत्सवात संयम व शिस्त पाळून सहकार्य करायचे आवाहन केले आहे.