26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

शिवजयंती निमित्त सिंधु रनरची ‘आरमार रन’ ; शिवज्योत घेऊन किल्ले सिंधुदुर्ग ते सावंतवाडी असे धावले २२ सिंधु रनर्स.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : ‘सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”
अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या राजांचे नांव आदरस्थानी आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरात उत्साहाने साजरी झाली. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने ‘आरमार रन’ हा उपक्रम राबवला. शिवजयंती निमित्त सिंधु रनर टीम ने किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) ते सावंतवाडी असे सुमारे ६६ किलोमीटर अंतर धावले. यात २२ धावकांनी न थांबता तब्बल ७ तास आणि ४० मिनिटे शिवज्योत हाती घेऊन पार केले.

सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातून अनेक शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) येथून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या शहरात जातात. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने हि ज्योत सलग धावून आणि सुरवात ते शेवट म्हणजे मालवण ते सावंतवाडी हे ६६ किलोमीटर अंतर तब्बल ७ तास आणि ४० मिनिटात पूर्ण करून नवीन इतिहास घडवला. एकत्रित रित्या एवढे लांबचे अंतर मशाल हाती घेऊन धावणारे शिवरायांचे ते पहिले मावळे ठरले.

१८ फेब्रुवारी २०२४ ला रात्री १०:३० वाजता हे धावक शिवज्योत घेऊन मालवण बंदर जेटी येथून सावंतवाडीकडे निघाले. या वेळेस त्यांना सदिच्छा देण्यासाठी सौ शिल्पा यतीन खोत (युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख) यांच्या वतीने श्री यतीन खोत (माजी नगरसेवक मालवण नगरपालिका) आणि ह्यूमन राईट्स असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे मालवण तालुका अध्यक्ष श्री. सुधीर धुरी आणि स्थानिक उपस्थित होते.

मालवणहून निघाल्या नंतर चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, झाराप मार्गे १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता हे सर्व धावक सावंतवाडी मध्ये दाखल होताच त्यांचे स्वागत सावंतवाडी तालुका ज्यूडो कराटे अससोसिएशन अध्यक्ष श्री वसंत जाधव आणि त्यांच्या लहान कराटे वीरांनी केले. गवळी तिठा येथून ही मशाल घेऊन सावंतवाडीतील जुडो कराटे प्रक्षिक्षण घेणारी लहान मुले आणि सिंधू रनर टीम चे धावक यांनी संपूर्ण मोतीतलावा भोवती फिरवून, याची सांगता सावंतवाडी राजवाडा येथे केली. सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात सहभागी सर्व धावकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सावंतवाडी संस्थान च्या युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात सहभागी सर्व लहान मुलांचा पदक देऊन सन्मान केला. ही शिवज्योत सतत तेवत राहावे म्हणून एक प्रतिकात्मक दिवा या मशालवरून प्रज्वलित करून सावंतवाडी राजवाडा येथे ठेवण्यात आला. या साहसी आणि ऐतिहासिक रन मध्ये ओंकार पराडकर, डॉ स्नेहल गोवेकर, भूषण बांदेलकर, भूषण पराडकर, प्रशांत शिरगांवकर, देवबा देसाई, रसिक परब, महेश शेटकर, अजित दळवी, भावेश माळी, फ्रँकी गोम्स, मेघराज कोकरे, विनायक पाटील, प्रशांत बांदेकर, रेश्मा कदम, प्रथमेश कदम, मॅक्स डिसोझा, प्रशांत माळकर, मिलिंद फर्नांडिस, निखिल तेंडोलकर, प्रज्योत राणे, आकाश पार्सेकर, करण पांचाळ आणि विनायक सरमळकर इत्यादी धावक सहभागी झाले होते.

या उपक्रमाबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, विविध न्यूज चॅनेल्स, पत्रकार , डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्या सावंतवाडी), प्रसिद्ध कब्बडी प्रशिक्षक जावेद शेख़, पख़वाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्रहि शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावक तयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन अशा आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नांव जगभरात गाजवले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : 'सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार । चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।"
अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या राजांचे नांव आदरस्थानी आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरात उत्साहाने साजरी झाली. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने 'आरमार रन' हा उपक्रम राबवला. शिवजयंती निमित्त सिंधु रनर टीम ने किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) ते सावंतवाडी असे सुमारे ६६ किलोमीटर अंतर धावले. यात २२ धावकांनी न थांबता तब्बल ७ तास आणि ४० मिनिटे शिवज्योत हाती घेऊन पार केले.

सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातून अनेक शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) येथून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या शहरात जातात. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने हि ज्योत सलग धावून आणि सुरवात ते शेवट म्हणजे मालवण ते सावंतवाडी हे ६६ किलोमीटर अंतर तब्बल ७ तास आणि ४० मिनिटात पूर्ण करून नवीन इतिहास घडवला. एकत्रित रित्या एवढे लांबचे अंतर मशाल हाती घेऊन धावणारे शिवरायांचे ते पहिले मावळे ठरले.

१८ फेब्रुवारी २०२४ ला रात्री १०:३० वाजता हे धावक शिवज्योत घेऊन मालवण बंदर जेटी येथून सावंतवाडीकडे निघाले. या वेळेस त्यांना सदिच्छा देण्यासाठी सौ शिल्पा यतीन खोत (युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख) यांच्या वतीने श्री यतीन खोत (माजी नगरसेवक मालवण नगरपालिका) आणि ह्यूमन राईट्स असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे मालवण तालुका अध्यक्ष श्री. सुधीर धुरी आणि स्थानिक उपस्थित होते.

मालवणहून निघाल्या नंतर चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, झाराप मार्गे १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता हे सर्व धावक सावंतवाडी मध्ये दाखल होताच त्यांचे स्वागत सावंतवाडी तालुका ज्यूडो कराटे अससोसिएशन अध्यक्ष श्री वसंत जाधव आणि त्यांच्या लहान कराटे वीरांनी केले. गवळी तिठा येथून ही मशाल घेऊन सावंतवाडीतील जुडो कराटे प्रक्षिक्षण घेणारी लहान मुले आणि सिंधू रनर टीम चे धावक यांनी संपूर्ण मोतीतलावा भोवती फिरवून, याची सांगता सावंतवाडी राजवाडा येथे केली. सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात सहभागी सर्व धावकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सावंतवाडी संस्थान च्या युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात सहभागी सर्व लहान मुलांचा पदक देऊन सन्मान केला. ही शिवज्योत सतत तेवत राहावे म्हणून एक प्रतिकात्मक दिवा या मशालवरून प्रज्वलित करून सावंतवाडी राजवाडा येथे ठेवण्यात आला. या साहसी आणि ऐतिहासिक रन मध्ये ओंकार पराडकर, डॉ स्नेहल गोवेकर, भूषण बांदेलकर, भूषण पराडकर, प्रशांत शिरगांवकर, देवबा देसाई, रसिक परब, महेश शेटकर, अजित दळवी, भावेश माळी, फ्रँकी गोम्स, मेघराज कोकरे, विनायक पाटील, प्रशांत बांदेकर, रेश्मा कदम, प्रथमेश कदम, मॅक्स डिसोझा, प्रशांत माळकर, मिलिंद फर्नांडिस, निखिल तेंडोलकर, प्रज्योत राणे, आकाश पार्सेकर, करण पांचाळ आणि विनायक सरमळकर इत्यादी धावक सहभागी झाले होते.

या उपक्रमाबद्दल या सर्व टीम मेंबर्स चे कौतुक होत आहे. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोसले, सावंतवाडी नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, डॉ अभिजीत वझे, डॉ मिलिंद खानोलकर, डॉक्टर्स अससोसिएशन ऑफ सावंतवाडी तसेच सावंतवाडी रिक्षा चालक मालक संघटना, विविध न्यूज चॅनेल्स, पत्रकार , डॉ बाबासाहेब पाटील (आयुर्वेद महाविद्या सावंतवाडी), प्रसिद्ध कब्बडी प्रशिक्षक जावेद शेख़, पख़वाज अलंकार महेश सावंत आणि दादा परब, नेमबाजी प्रशिक्षक कांचन उपरकर अश्या सर्व मान्यवरांकडून सिंधू रनर टीमचे कौतुक होत आहे. अशीच कामगिरी सिंधू रनर टीम बजावत राहील यात किंचित मात्रहि शंका नाही. सिंधुदुर्गात नवनवीन धावक तयार होऊन त्यांना नवीन व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधू रनर टीम प्रयत्न करत आहे. कोकण सारख्या कमी साधने, कमी मार्गदर्शन आणि धावणे या खेळा कडे दुर्लक्षित भागात स्वतःच्या जिद्दीने, प्रतिकूल परिस्थिती कष्ट करून त्यांनी हे यश संपादन केले. सिंधू रनर टीम ने आता पर्यंत सावंतवाडी १२ तास रन ३ वेळेस, गोवा ते सावंतवाडी १०० किलोमीटर रन २ वेळेस, मालवण ते सावंतवाडी आरमार रन ३ वेळेस, २४ तास स्टेडियम रन, हिमालयन खारडुंगला अल्ट्रा रन ७२ किलोमीटर, देहू ते पंढरपूर २६६ किलोमीटर, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, पुणे अल्ट्रा मॅरेथॉन, जम्पिंग गोरिला ट्रेल रन, लोकमत मॅरेथॉन, ठाणे हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन, वसई विरार मॅरेथॉन, अदानी अहेमदाबाद मॅरेथॉन, गोवा रिव्हर मॅरेथॉन अशा आणि अनेक रन मध्ये भाग घेऊन आपल्या जिल्याह्याचे नांव जगभरात गाजवले आहे.

error: Content is protected !!