मुंबई | प्रतिनिधी : मुंबईच्या सौ. भूमिका पांचोली ‘मिसेस मिडल ईस्ट २०२४’ स्पर्धेत विजयी ठरल्या आहेत. सौ. भूमिका पांचोली आणि कुटुंबासाठी हा अभिमानाचा ठरला.
यूएई मध्ये स्पर्धा जानेवारीच्या अखेरीस आयोजित करण्यात आली होती. सौ. भूमिका मूळ मुंबईच्या आहेत आणि सध्या त्या यूएई मध्ये रहातात. त्या महिलांना त्यांच्या आवडी आणि स्वप्नांचे अनुसरण करण्यासाठी सक्षम बनविण्यावर विश्वास ठेवतात. लिपिका फॅशन, अलोहा आणि ’39 ब्रँडिंग’ द्वारे अबू धाबीमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या मिस्टर आणि मिसेस मिडल इस्ट स्पर्धेतील त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.