28.2 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

कणकवली महाविद्यालयात सामाजिक विज्ञान शोध मासिकाचे विमोचन

- Advertisement -
- Advertisement -

लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

कणकवली / उमेश परब : शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली काँलेज कणकवली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.प्राचार्य डॉ. प्रा. राजेंद्र कुमार चौगुले यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा फोंडाघाट येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बालाजी सुरवसे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते या प्रसंगी सामाजिक विज्ञान मंडळाच्या आंतरराष्ट्रीय शोध मासिक विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, प्राध्यापकांनी संशोधन पेपर तयार करून सामाजिक समस्यांचा शोध घेतला पाहिजे.
प्रा. सोमनाथ कदम यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यांचा थोडक्यात आढावा घेतला तर प्रा.सीमा हडकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.
प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना दोन्ही महामानवांच्या कार्याचा आढावा घेतला. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नऊ साहित्यकृतींवर आधारित निर्माण झाले.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात वंचित समाजाचे वर्णन असून शेतकरी, कामगार यांचे प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी मांडले आहेत.तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रीय कार्याला तोड नाही. लोकमान्य टिळकांचे कार्य हे आजही राष्ट्रप्रेम जागृत करणारे आहे’असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.युवराज महालिंगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. बी.एल. राठोड यांनी केले.तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

कणकवली / उमेश परब : शिक्षण प्रसारक मंडळाचे ,कणकवली काँलेज कणकवली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.प्राचार्य डॉ. प्रा. राजेंद्र कुमार चौगुले यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य तथा फोंडाघाट येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बालाजी सुरवसे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते या प्रसंगी सामाजिक विज्ञान मंडळाच्या आंतरराष्ट्रीय शोध मासिक विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, प्राध्यापकांनी संशोधन पेपर तयार करून सामाजिक समस्यांचा शोध घेतला पाहिजे.
प्रा. सोमनाथ कदम यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यांचा थोडक्यात आढावा घेतला तर प्रा.सीमा हडकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला.
प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना दोन्ही महामानवांच्या कार्याचा आढावा घेतला. 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नऊ साहित्यकृतींवर आधारित निर्माण झाले.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यात वंचित समाजाचे वर्णन असून शेतकरी, कामगार यांचे प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी मांडले आहेत.तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रीय कार्याला तोड नाही. लोकमान्य टिळकांचे कार्य हे आजही राष्ट्रप्रेम जागृत करणारे आहे'असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.युवराज महालिंगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. बी.एल. राठोड यांनी केले.तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!