मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब सुकन्या कु. पूजा अशोक पळसंबकर हिने कला संचालनालय महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन मध्ये भाग घेतला होता . त्यामध्ये तिने काढलेल्या चित्राला व उत्कृष्ट रंगकामाला पहिल्या पधंरा जणांच्या यादित स्थान प्राप्त झाले. आज १४ फेब्रुवारीला राज्यपालांच्या हस्ते कु. पूजा अशोक पळसंबकर हिला जहांगीर आर्ट गॅलरी मुबंई येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सन्मान चिन्ह ,प्रमाणपत्र ५००००/ रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तिचे पळसंब गावातून व सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे.



पळसंब मध्ये कलाकार घडण्यासाठी पूजा नक्कीच आपले योगदान पळसंब मधील युवापिढी देईल असा विश्वास आम्हाला आहे असे मनोगत माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी व्यक्त केले आहे. पूजा गावी आल्यावर तिचा पळसंब गावाच्या रुढी पंरपरेनुसार सन्मान केला जाईल असे ही स्पष्ट करण्यात आले. श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब यांनीही कु. पूजा हिचे अभिनंदन केले आहे.