लोकराजा कै. सुधीर कलिंगण द्वितीय स्मृतिदिनी नेरूर येथे आयोजीत कार्यक्रम.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : दशावतार ही लोककला देशातच नाही तर जगात पोहोचली आहे. ही कला खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार नेण्याचे काम लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांनी केले. त्यामुळेच जनतेने त्यांना दशावतारातील लोकराजा हि पदवी दिली. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी त्याच ताकदीने दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले. रसिक प्रेक्षकांनी देखील कलिंगण कुटुंबियांना भरभरून प्रतिसाद दिला. या कलेला राजकीय क्षेत्रामधून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.
लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचा द्वितीय स्मृतिदिन काल नेरूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कै. सुधीर कलिंगण यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडीगावकर, काका कलिंगण, राजू कलिंगण, बाळा कलिंगण,आबा कलिंगण,भास्कर सामंत, मंजुनाथ फडके, दत्ता देसाई, यशवंत काका तेंडुलकर, सिद्धेश कलिंगण,पंकज कलिंगण, ऍड सोनू गवस, संतोष रेडकर, बाळा सावंत,प्रेमानंद देसाई, ऍड. पी. डी. देसाई, प्रा. प्रणाली मयेकर, दया धाऊसकर, चंद्रकांत खोत, बाबली आकेरकर,श्री. आजगावकर आदी उपस्थित होते.