मालवण | सुयोग पंडित : ‘जस्टीस डिलेयड्…जस्टीस डिनाईड’ अशा मूलभूत मानव हक्क व संरक्षण तत्वाची तळागाळातील प्रत्येक माणसाला जाणीव व्हावी आणि आपल्या भारतीय संविधानाने दिलेल्या न्याय हक्काची जागृती व्हावी या उद्देशाने गेली ४ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध स्तरांतील लोकांना आश्वासक ठरलेल्या ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या ४ था जिल्हा मेळावा व कार्यशाळा, ४ फेब्रुवारीला मालवण जवळच्या कोळंब येथील समर्थ हाॅल येथे अत्यंत उत्साहाने व मेळाव्याच्या उद्देशाच्या गांभिर्याने संपन्न झाला.
यजमान मालवण तालुका ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन यांचे आयोजन असलेल्या या मेळाव्याचे अध्यक्ष वित्त व न्याय विभागाच्या ग्राहक न्यायालयाचे माजी अध्यक्ष ॲड राजेंद्र पैलवान होते तर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले हे प्रमुख उद्घाटक होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री परशुराम गंगावणे, मेडिक्लेम व एम एस ई बी विभाग प्रमुख डाॅ. अमोल धर्मजिज्ञासू होते तर ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री खंडूदेव कठारे, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम, राज्य सचिव राकेश शिंदे, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष मंदार काणे हे विशेष उपस्थित होते. कार्यक्रम स्थळी सर्व मान्यवरांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले व पारंपारिक तुतारिची विशेष मानवंदना देण्यात आली. या मेळाव्याला जिल्ह्यातील विविध प्रतिष्ठीत सामाजिक, राजकीय व्यक्तींनी विशेष शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहाराने अर्पण करत वंदन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकाने कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यानंतर ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ़भाई पीरखान व संतोष नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र पैलवान यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.युवराज लखमराजे भोसले यांचा स्वागत सत्कार जिल्हाध्यक्ष मंदार काणे व उपाध्यक्ष किशोर राणे यांनी केला. जिल्हा सचिव अर्जुन परब व जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडोलकर यांनी पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर कोकण विभागीय अध्यक्ष यांचा सत्कार संपन्न झाला. तन्वीर खतिब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव कठारे यांचा स्वागत सत्कार केला. डाॅ अमोल धर्मजिज्ञासू यांचा व प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांनी केला. राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर यांचा सत्कार मालवण तालुका सचिव राजेश लब्दे व देवगड तालुका सचिव महेंद्र देवगडकर यांनी केला. राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम यांचा सत्कार मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभूखानोलकर व कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे यांनी केला. राज्य सचिव राकेश शिंदे यांचा सत्कार सावंतवाडी कार्याध्यक्ष सौ. मोहिनी माडगावकर व गोवा राज्य अध्यक्ष सौ. बांदेकर यांनी केला. या मेळाव्या कणवलीतील माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांच्या वतीने संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी भेट देऊन कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या व ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.
यानंतर प्रमुख उद्गाटक लखमराजे भोसले यांनी उपस्थित सर्वांना संबोधीत केले. त्यांनी यापुढील युग हे प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे पुरुष असे नसुन प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिला असल्याने ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन केले. यानंतर प्रमुख पाहुणे पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्यांच्या भाषणात ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या कार्यपद्धतीची व कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची विशेष प्रशंसा केली. यानंतर या कार्यक्रमातील सत्कारमूर्ती राज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त नंदन घोगळे, सिंधू रनर टीमचा जागतीक धावक ओंकार पराडकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. मीनल पार्टे, ७७ वेळा रक्तदान केलेले रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर, ४६ वेळा प्लेटलेटचे दाता यशवंत गावडे, सिंधुयुवा उद्योजक पुरस्कार प्राप्त मंगेश चव्हाण, सर्पमित्र व रक्तमित्र महेश राऊळ, माजी नगरसेविका जयमाला मयेकर, समर्थ मंगल कार्यालयाचे मालक प्रवीण सावंत, कला, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील सक्रीय श्रावणी मद्भावे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
या दरम्यान अपंग बांधव तसेच ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने लाभ मिळालेल्या विविध लाभार्थींनी संघटनेबद्दल आपले सकारात्मक अनुभव सांगितले आणि कृतज्ञता व्यक्त केली. याच दरम्यान कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांचे वडिल निवृत्त शिक्षक श्री नाईक यांचा सत्कार संपन्न झाला. संतोष नाईक यांची सलग तिसर्यांदा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर होताच उपस्थित सर्वांनी त्यांचे टाळ्यांचा गजरात अभिनंदन केले.
या नंतर डाॅ. अमोल धर्मजिज्ञासू, राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव कठारे, राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम व मान्यवरांनी उपस्थित सर्वांना ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनच्या कामाची माहिती देत संबोधीत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड राजेंद्र पैलवान यांनी अध्यक्षीय भाषणात ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग व मालवण यांची प्रशंसा केली. ॲड राजेंद्र पैलवान यांनी कायदा, मानवता, दैनंदिन जीवन, ग्राहक हक्क, विमा अधिकार आणि विविध घटकांसाठी घटनेतिल मूलभूत कमलांची माहिती दिलो व उपस्थित सर्वांशी प्रश्नोत्तरे व संवाद साधला. कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी आभार प्रदर्शन केले तर निलेश पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या मेळाव्याच्या उद्गाटन सोहळा व सत्कार या नंतर ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यासाठी विशेष कार्यशाळा संपन्न झाली. मालवण मधील या मेळाव्याला ह्यूमन राईटस् असोसिएशन फाॅर प्रोटेक्शनचे जिल्हाभरातील पदाधिकारी, सदस्य व मालवणमधिल सर्व स्तरांतील व्यक्ती उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी मालवण तालुका अध्यक्ष सुधीर धुंरी व जिल्हा कार्यकारिणीच्या नियोजनाची प्रशंसा केली. मानवतेसाठी मानवता हक्काचा हा चौथा मेळावा संपन्न करायला मार्गदर्शन केलेले राज्य निरीक्षक घनःश्याम सांडिम व कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांचे जिल्हा अध्यक्ष मंदार काणे व तालुका अध्यक्ष सुधीर धुंरी यांनी आभार मानले.
या मेळाव्याला कणकवली तालुकाध्यक्ष सौ. संजना सदडेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष संजय शेळके, देवगड तालुकाध्यक्ष आशिफ मुल्ला, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, कुडाळ तालुकाध्यक्ष सौ. संजना सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष तनवीर खतीब. कणकवली कार्याध्यक्ष हनीफभाई पीरखान मालवण कार्याध्यक्ष सुभाष खानोलकर सावंतवाडी कार्याध्यक्ष सौ मोहिनी मडगांवकर, मालवण तालुका सचिव राजेश लब्दे, जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर, सहसचिव महेश मयेकर, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर मालवण तालुका महिला संघटक मुक्ता रजपूत. सर्व तालुका पदाधिकारी व सदस्य सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष मंदार काणे, जिल्हा सचिव अर्जुन परब (काका) जिल्हा खजिनदार संजय शेळके, जिल्हा निरीक्षक मानसी परब, जिल्हा संघटक डॉक्टर वैभव आईर, जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडुलकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय खानविलकर, जिल्हा महिला संघटक मिलन पार्टे, जिल्हा महिला संघटक शिवानी पाटकर उपस्थित होते.
जिल्हा सचिव अर्जुन परब सिंधुदुर्गातील हायस्कूलला पंचवीस हजार रुपयेची आर्थिक मदत मिळवून दिली आणि डॉक्टर विवेक रेवडेकर कणकवली डॉक्टर निलेश पाकळे कणकवली डॉक्टर धनंजय रासम कणकवली डॉक्टर हर्षद कुमार पटेल. तसेच नरेश कामतेकर रामगड, प्रणय बांदिवडेकर वैभववाडी सुधीर पराडकर सावंतवाडी प्रवीण सावंत समर्थ हॉलचे मालक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी आवर्जून विशेष उल्लेखनीय आभार मानले व या पुढील वाटचालीसाठी आपल्याला दुसर्यांदा सोपवल्या गेलेल्या कोकण विभागीय अध्यक्ष पदाचे श्रेय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सदस्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वरीष्ठ यांना दिले.