थॅलेसेमिया निर्मूलन व रक्तदान जागृतीसाठी अथक झटणारा समूह तथा चळवळ.
मालवण | सहिष्णू पंडित : कोरोना काळादरम्यान रक्तदानविषयक जनजागृती आता व्यापक प्रमाणावर होऊ लागली आहे.परंतु मुंबईस्थित काही सिंधुदुर्गवासीय व इतर मुंबईकर मिळून अनेक रक्तदानाचे उपक्रम गेली अनेक वर्षे राबवत आलेले आहेत.
सिंधुदुर्ग रेड बटालियन हीसुद्धा अशीच एक रक्तदान जागृतीतून महाभयंकर अशा थॅलेसेमिया निर्मूलनासाठी वर्षाचे बाराही महिने कार्यरत असते. या रक्तदान जागृती अंतर्गत सिंधुदुर्ग रेड बटालियनचे सर्व रक्तदाते व हितचिंतक मिळून अनेक औचित्यांचा, सणांचा व घटनांचा सदुपयोग करुन रक्तदान शिबीराचे आयोजन करतात.
बहुतांश मुंबईस्थित सिंधुदुर्गवासीय या चळवळीचा हिस्सा असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर रक्तदान चळवळींनाही यामार्फत प्रेरणा द्यायचे समाजकार्य सिंधुदुर्ग रेड बटालियन व मुंबईस्थित इतर अनेक रक्तदाते करत असतात.
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 02:00 या कालावधीत सिंधुदुर्ग रेड बटालियनने समर्पण ब्लड बॅन्क,घाटकोपर (पश्चिम), येथे रक्तदानातून दिवाळी साजरी करायचा संकल्प केला आहे.
तरिही या रक्तदान शिबीराला जास्तीतजास्त मराठी, कोकणवासी व मुंबईकरांनी प्रतिसाद देऊन रक्तदान करायचे आवाहन सिंधुदुर्ग रेड बटालियनच्या सर्व शिलेदारांकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 9669608168 वर संपर्क साधायचेही सांगण्यात आले आहे.