25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणात ३६ वा सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाचा व्यापारी एकता मेळावा विराट व्यापारी उत्साहाने संपन्न ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, काॅन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे संस्थापक व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, स्मार्ट आर्किटेक्टसचे डिजीटल मार्गदर्शक निहार साईल, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, कोकणत्न उद्योजक दीपक परब यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती.

- Advertisement -
- Advertisement -

सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सुनियोजीत यजमानपदाची जिल्हाभरातील व्यापारी महासंघाच्या बांधवांनी केली मुक्त कंठाने प्रशंसा ; मालवण व्यापारी महासंघाच्या युवा व्यापारी ब्रिगेडचे योगदान ठरले सोहळ्याचा ‘स्पेशल इफेक्ट..!’

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा, आज ३१ जानेवारीला मालवण शहरातल्या बोर्डिंग ग्राऊंडवर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भव्य आयोजन आणि युवा व्यापारी ब्रिगेडच्या स्पेशल इफेक्टने विशेष चर्चेच्या ठरलेल्या या मेळाव्यात व्यापार तथा वाणिज्य क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, विविध वाणिज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, तंत्रशुध्द वाणिज्य अभ्यासक, डिजीटल वाणिज्य विश्लेषक यांच्या उपस्थितीने व्यापारी महासंघाच्या मंचावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या बांधवांना एक ‘वाणिज्य पर्वणी’ अनुभवता आली. ४००० पेक्षा जास्त व्यापारी बंधू भगिनींची नियोजनबद्ध उपस्थिती हे या मेळाव्याचे वैशिष्ठ्य ठरले.

व्यापारी एकता मेळाव्याच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, आमदार तसेच प्रगत उद्योजक आमदार वैभव नाईक, अनिल सौदागर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, व्यापारी व मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष व कार्यवाह नितीन वाळके , , कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे संस्थापक व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, आय लीड ट्रेनिंग संचालक विनोद मेस्त्री, स्मार्ट अर्किटेक निहार साईल, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, उपाध्यक्ष सागर शिरसाट, उपाध्यक्ष महेश नार्वेकर, उपाध्यक्ष संजय भोगटे, राजन नाईक, मधुकर नलावडे, संतोष कुडाळकर, राजेश शिरसाट, मंगेश गुरव, निलेश धडाम, सिद्धेश केसरकर, आनंद नेवगी, दिपक भोगले, हर्षल गवाणकर, सद्गुरु तांडेल, नंदन वेंगुर्लेकर, अशोक गाड, अभय सातार्डेकर, अवधूत शिरसाट, पुंडलिक दळवी, श्रीराम शिरसाट, विवेक खानोलकर, तेजस आंबेकर, जगदीश मांजरेकर, प्रमोद ओरसकर, शैलेश कदम, दिपक बेलवलकर, प्रशांत नाईक, रघुनंदन राणे, वामन आचरेकर, सिताराम कराळे, प्रवीण गाड, संजय कुशे, रोहिदास तारी, सचिन मेहंदळे, अविनाश नरे, राजा शंकरदास, गणेश प्रभुलीकर, रवी तळाशीलकर, मंदार ओरसकर असे मान्यवर व व्यापारी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याच्या सुरवातीला मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष तसेच सुवर्णकार श्री उमेश नेरुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. श्री राजू जठार यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी बोलताना प्रमुख उद्गाटक कोकणत्न उद्योजक डॉ. दीपक परब यांनी मालवणच्या मेळाव्याचे उद्घाटन करणे सौभाग्य मला मिळाल्याचे सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दिल्लीहून विशेष संबोधन व शुभेच्छा.

प्रगत उद्योजक तथा आमदार आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वंकष प्रगतीसाठी व्यापारी महासंघाने कसे योगदान दिले आणि सद्य वर्तमान काळातील आपली जडणघडण व प्रगतीची जी वाटचाल सुरु आहे त्याचे श्रेय व्यापारी महासंघाला दिले. व्यापारी संघाची धोरणात्मक एकता ही विविध घटकांना उपयोगी ठरलेली आहे. रोज होणार्या बदलांवर लक्ष ठेवून उद्योग – व्यापारात मार्गाक्रमण करावे असेही त्यांनी मार्गदर्शन केले. आपण एका उत्पादनाची डीलरशीप हाताळताना येणारे व्यापारी अनुभवही त्यांनी कथन केले.

प्रमुख वक्ते कॅटचे संस्थापक प्रविण खंडेलवाल यांनी छोट्या व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणातील व्यवसायामध्ये सहभाग मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भारत इ मार्ट ही वेबसाईट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सुनील सौदागर यांनी छोट्या छोट्या योजना, कर्ज , सीबील स्कोअर सक्षमता यावर मंलभूत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मालवण व्यापारी संघाचे खजिनदार गणेश प्रभुलकर, यजमान सदस्य विजय केनवडेकर व नितीन वाळके यांनी केले. स्मार्ट आर्किटेक्टसचे निहार साईल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी डिरेक्टरी ही संकल्पना समजावताना व्यापाराची संघटीत डिजीटल प्रणाली आणि त्याचे संचलन यावर प्रमुख वक्ता म्हणून सखोल मार्गदर्शन केले.

दुपारी अल्पोपहारानंतरच्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी चव्हाण यांचा व्यापारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघांचे अध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण व्यापारी संघांचे उमेश नेरुरकर, उद्योजक दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण व्यापारी संघ उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी “भारत माताकी जय व वंदे मातरमच्या” घोषणांनी उपस्थित व्यापारी बंधू भगिनींसाठीच्या विशेष संबोधनाची सुरवात केली. ते म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात व्यापार, उद्योगासाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधानांची भूमिका देशहिताची असून जुन्या कायद्यांमध्ये बदल, बँकिंग क्षेत्रात बदल, जनधन योजना, जिएसटी सारखी एक कर प्रणाली, मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप योजना या विविध उपक्रमामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला फायदा झाला आहे. कोरोना महामारी काळातही देशातील व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळे व पारदर्शी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली आहे, असेही ते म्हणाले. तसेच जिल्ह्यात काजू बी प्रमाणे बोंडूला देखील दर मिळावा, त्याच्या अर्कापासून नवीन उत्पादनांची निर्मिती करावी याकडे शासन लक्ष देत आहे. त्यासाठी प्रक्रिया केंद्रही शासन उभारणार आहे. यातून बागायतदारांना प्रति बोंडू ७ रुपये दर मिळू शकतो. व्यापाऱ्यांच्या विविध विषयांना मार्गस्थ करण्यासाठी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या व्यापारी मेळाव्यात जिल्हा व्यापारी संघाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये समजला जाणारा ज्येष्ठ व्यापारी जीवनगौरव पुरस्कार मालवण मधील ज्येष्ठ व्यापारी आणि मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर कै.माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार ज्येष्ठ हॉटेल उद्योजिका सुरेखा वाळके यांना, कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार खारेपाटण व्यापारी संघटना यांना, कै.बि.एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामिण नव उद्यमी पुरस्कार नांदोस कट्टा येथील विघ्नेश मार्केटिंगचे महेश यादव यांना, सेवाव्रती श्री.बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा उद्यमी पुरस्कार सावंतवाडी आंबोली येथील व्हिसलींग वूडस् चे हेमंत ओगले यांना, आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार देवगड व्यापारी संघांचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांना व कै. उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मालवणच्या सौ. रिया बांदेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

व्यापारी महासंघाच्या या मेळाव्यातील युवा ब्रिगेड तथा यजमान मालवण व्यापारी संघाच्या सदस्यांनी दिलेल्या योगदानाची तसेच आणखीन ८ वर्षांनी मालवण शहरात आयोजीत केल्या जाणार्या हायटेक नियोजनाच्या ग्वाहीची उपस्थित सर्वांनी विशेष प्रशंसा केली. युवा व्यापारी फळीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सन्मानही केला.

जवळपास गेले वर्षभर आखणी व गेले महिनाभर अथक त्याची यशस्वी अंमलबजावणी करणार्या मालवण व्यापारी संघाच्या ज्येष्ठ, युवा व महिला व्यापारी पदाधिकारी व सदस्यांची जिल्हाअध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी विशेष प्रशंसा केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सुनियोजीत यजमानपदाची जिल्हाभरातील व्यापारी महासंघाच्या बांधवांनी केली मुक्त कंठाने प्रशंसा ; मालवण व्यापारी महासंघाच्या युवा व्यापारी ब्रिगेडचे योगदान ठरले सोहळ्याचा 'स्पेशल इफेक्ट..!'

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा, आज ३१ जानेवारीला मालवण शहरातल्या बोर्डिंग ग्राऊंडवर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भव्य आयोजन आणि युवा व्यापारी ब्रिगेडच्या स्पेशल इफेक्टने विशेष चर्चेच्या ठरलेल्या या मेळाव्यात व्यापार तथा वाणिज्य क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, विविध वाणिज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, तंत्रशुध्द वाणिज्य अभ्यासक, डिजीटल वाणिज्य विश्लेषक यांच्या उपस्थितीने व्यापारी महासंघाच्या मंचावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी महासंघाच्या बांधवांना एक 'वाणिज्य पर्वणी' अनुभवता आली. ४००० पेक्षा जास्त व्यापारी बंधू भगिनींची नियोजनबद्ध उपस्थिती हे या मेळाव्याचे वैशिष्ठ्य ठरले.

व्यापारी एकता मेळाव्याच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, आमदार तसेच प्रगत उद्योजक आमदार वैभव नाईक, अनिल सौदागर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, व्यापारी व मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष व कार्यवाह नितीन वाळके , , कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे संस्थापक व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल, आय लीड ट्रेनिंग संचालक विनोद मेस्त्री, स्मार्ट अर्किटेक निहार साईल, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर, सहकार्यवाह राजू जठार, उपाध्यक्ष सागर शिरसाट, उपाध्यक्ष महेश नार्वेकर, उपाध्यक्ष संजय भोगटे, राजन नाईक, मधुकर नलावडे, संतोष कुडाळकर, राजेश शिरसाट, मंगेश गुरव, निलेश धडाम, सिद्धेश केसरकर, आनंद नेवगी, दिपक भोगले, हर्षल गवाणकर, सद्गुरु तांडेल, नंदन वेंगुर्लेकर, अशोक गाड, अभय सातार्डेकर, अवधूत शिरसाट, पुंडलिक दळवी, श्रीराम शिरसाट, विवेक खानोलकर, तेजस आंबेकर, जगदीश मांजरेकर, प्रमोद ओरसकर, शैलेश कदम, दिपक बेलवलकर, प्रशांत नाईक, रघुनंदन राणे, वामन आचरेकर, सिताराम कराळे, प्रवीण गाड, संजय कुशे, रोहिदास तारी, सचिन मेहंदळे, अविनाश नरे, राजा शंकरदास, गणेश प्रभुलीकर, रवी तळाशीलकर, मंदार ओरसकर असे मान्यवर व व्यापारी बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याच्या सुरवातीला मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष तसेच सुवर्णकार श्री उमेश नेरुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. श्री राजू जठार यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी बोलताना प्रमुख उद्गाटक कोकणत्न उद्योजक डॉ. दीपक परब यांनी मालवणच्या मेळाव्याचे उद्घाटन करणे सौभाग्य मला मिळाल्याचे सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दिल्लीहून विशेष संबोधन व शुभेच्छा.

प्रगत उद्योजक तथा आमदार आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वंकष प्रगतीसाठी व्यापारी महासंघाने कसे योगदान दिले आणि सद्य वर्तमान काळातील आपली जडणघडण व प्रगतीची जी वाटचाल सुरु आहे त्याचे श्रेय व्यापारी महासंघाला दिले. व्यापारी संघाची धोरणात्मक एकता ही विविध घटकांना उपयोगी ठरलेली आहे. रोज होणार्या बदलांवर लक्ष ठेवून उद्योग - व्यापारात मार्गाक्रमण करावे असेही त्यांनी मार्गदर्शन केले. आपण एका उत्पादनाची डीलरशीप हाताळताना येणारे व्यापारी अनुभवही त्यांनी कथन केले.

प्रमुख वक्ते कॅटचे संस्थापक प्रविण खंडेलवाल यांनी छोट्या व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणातील व्यवसायामध्ये सहभाग मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने भारत इ मार्ट ही वेबसाईट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सुनील सौदागर यांनी छोट्या छोट्या योजना, कर्ज , सीबील स्कोअर सक्षमता यावर मंलभूत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मालवण व्यापारी संघाचे खजिनदार गणेश प्रभुलकर, यजमान सदस्य विजय केनवडेकर व नितीन वाळके यांनी केले. स्मार्ट आर्किटेक्टसचे निहार साईल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी डिरेक्टरी ही संकल्पना समजावताना व्यापाराची संघटीत डिजीटल प्रणाली आणि त्याचे संचलन यावर प्रमुख वक्ता म्हणून सखोल मार्गदर्शन केले.

दुपारी अल्पोपहारानंतरच्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी चव्हाण यांचा व्यापारी महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघांचे अध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण व्यापारी संघांचे उमेश नेरुरकर, उद्योजक दत्ता सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मालवण व्यापारी संघ उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी "भारत माताकी जय व वंदे मातरमच्या" घोषणांनी उपस्थित व्यापारी बंधू भगिनींसाठीच्या विशेष संबोधनाची सुरवात केली. ते म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात व्यापार, उद्योगासाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधानांची भूमिका देशहिताची असून जुन्या कायद्यांमध्ये बदल, बँकिंग क्षेत्रात बदल, जनधन योजना, जिएसटी सारखी एक कर प्रणाली, मुद्रा कर्ज योजना, स्टार्टअप योजना या विविध उपक्रमामुळे व्यापार व उद्योग क्षेत्राला फायदा झाला आहे. कोरोना महामारी काळातही देशातील व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळे व पारदर्शी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली आहे, असेही ते म्हणाले. तसेच जिल्ह्यात काजू बी प्रमाणे बोंडूला देखील दर मिळावा, त्याच्या अर्कापासून नवीन उत्पादनांची निर्मिती करावी याकडे शासन लक्ष देत आहे. त्यासाठी प्रक्रिया केंद्रही शासन उभारणार आहे. यातून बागायतदारांना प्रति बोंडू ७ रुपये दर मिळू शकतो. व्यापाऱ्यांच्या विविध विषयांना मार्गस्थ करण्यासाठी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या व्यापारी मेळाव्यात जिल्हा व्यापारी संघाकडून देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये समजला जाणारा ज्येष्ठ व्यापारी जीवनगौरव पुरस्कार मालवण मधील ज्येष्ठ व्यापारी आणि मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर कै.माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार ज्येष्ठ हॉटेल उद्योजिका सुरेखा वाळके यांना, कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार खारेपाटण व्यापारी संघटना यांना, कै.बि.एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामिण नव उद्यमी पुरस्कार नांदोस कट्टा येथील विघ्नेश मार्केटिंगचे महेश यादव यांना, सेवाव्रती श्री.बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा उद्यमी पुरस्कार सावंतवाडी आंबोली येथील व्हिसलींग वूडस् चे हेमंत ओगले यांना, आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार देवगड व्यापारी संघांचे तालुकाध्यक्ष शैलेश कदम यांना व कै. उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मालवणच्या सौ. रिया बांदेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

व्यापारी महासंघाच्या या मेळाव्यातील युवा ब्रिगेड तथा यजमान मालवण व्यापारी संघाच्या सदस्यांनी दिलेल्या योगदानाची तसेच आणखीन ८ वर्षांनी मालवण शहरात आयोजीत केल्या जाणार्या हायटेक नियोजनाच्या ग्वाहीची उपस्थित सर्वांनी विशेष प्रशंसा केली. युवा व्यापारी फळीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष सन्मानही केला.

जवळपास गेले वर्षभर आखणी व गेले महिनाभर अथक त्याची यशस्वी अंमलबजावणी करणार्या मालवण व्यापारी संघाच्या ज्येष्ठ, युवा व महिला व्यापारी पदाधिकारी व सदस्यांची जिल्हाअध्यक्ष प्रसाद पारकर, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी विशेष प्रशंसा केली.

error: Content is protected !!