30.1 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

तळाशील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट ; २६ जानेवारीच्या खाडीपात्रातील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंळडवी गांवातील तळाशिल येथे २६ जानेवारी २०२४ ला तळाशील मधील ४९ महिला ग्रामस्थांनी कालावल खाडी पात्रात बसून तळाशील समोरील खाडीतिल वाळू उपसा, होणारी धूप, दिवसेंदिवस निमुळता होत जाणारे तळाशीलचे भौगोलिक अस्तित्व, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे मचूळ होणे अशा विविध मुद्द्यांसाठी उपोषण केले होते. त्यादिवशी अख्खा दिवस ४९ महिला दिवसभर पाण्यात बसून असताना गांवातील पुरुष ग्रामस्थांनीही त्यांना खाडीपात्रात दिवसभर उपस्थित राहून पाठिंबा दिला होता. त्यादिवशी सायंकाळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या आश्वासना नंतर सोमवारी २९ जानेवारीला तळाशील ग्रामस्थ आणि महिला हे तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री जयहरी कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली तळाशिल ग्रामस्थ शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची सायंकाळी ५ वाजता भेट घेतली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सर्व बाजु ऐकून त्याबाबत सकारात्मक चर्चा केली. येत्या दोन दिवसांत स्वतः संबंधित सर्व अधिकारी यांना घेऊन तळाशील गावात येवून पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर तावडे , जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर , जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पत्तन विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग, खनिकर्म विभाग, मालवण पोलीस, प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या तोंळडवी गांवातील तळाशिल येथे २६ जानेवारी २०२४ ला तळाशील मधील ४९ महिला ग्रामस्थांनी कालावल खाडी पात्रात बसून तळाशील समोरील खाडीतिल वाळू उपसा, होणारी धूप, दिवसेंदिवस निमुळता होत जाणारे तळाशीलचे भौगोलिक अस्तित्व, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे मचूळ होणे अशा विविध मुद्द्यांसाठी उपोषण केले होते. त्यादिवशी अख्खा दिवस ४९ महिला दिवसभर पाण्यात बसून असताना गांवातील पुरुष ग्रामस्थांनीही त्यांना खाडीपात्रात दिवसभर उपस्थित राहून पाठिंबा दिला होता. त्यादिवशी सायंकाळी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी उपोषण स्थळाला भेट दिली होती. त्यांनी दिलेल्या आश्वासना नंतर सोमवारी २९ जानेवारीला तळाशील ग्रामस्थ आणि महिला हे तळाशील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री जयहरी कोचरेकर यांच्या नेतृत्वाखाली तळाशिल ग्रामस्थ शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची सायंकाळी ५ वाजता भेट घेतली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सर्व बाजु ऐकून त्याबाबत सकारात्मक चर्चा केली. येत्या दोन दिवसांत स्वतः संबंधित सर्व अधिकारी यांना घेऊन तळाशील गावात येवून पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी किशोर तावडे , जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर , जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पत्तन विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, बंदर विभाग, खनिकर्म विभाग, मालवण पोलीस, प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!