रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) पथकाचे छापे घातले गेले आहेत.गेले वर्षभर आमदार साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु होती. आमदार साळवी, त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ यांचीही यापूर्वी चौकशी झाली होती. गेल्या चौकशीच्या तारखेनंतर त्यांनी आपण पुन्हा चौकशीला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यानंतर आज ताचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रत्नागिरीतील घरावर छापे घातले छाप घातला तेव्हा आधी आमदार साळवी घरी अनुपस्थित होते, मात्र नंतर ते हजर झाले त्यांच्या हॉटेलमध्ये सुद्धा पथक पोहोचले आपण सहकार्य करणार असल्याची भूमिका आमदार साळवी यांनी घेतली आहे.






राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबी पथकाचा छापा ; आमदार राजन साळवी यांची संपूर्ण सहकार्याची भूमिका.
118
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -