बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा तर्फे माध्यमिक विद्यालय डेगवे येथे चित्रकला स्पर्धा व पतंग बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चित्रकला स्पर्धा राममंदिर किंवा रामायण या विषयावर घेण्यात आली. दोन्ही स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरस्वती चुडे प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, प्रियांका देसाई मॅडम, रोटरॅक्ट चे अध्यक्ष अक्षय मयेकर, खजिनदार शिवम गावडे, सहसचिव मिताली सावंत, संकेत वेंगुर्लेकर, रुपाली देसाई, ईश्वरी कल्याणकर व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा नेहमीच शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात. आजचे जग हे मोबाईल युग आहे अश्यात मुलांना कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्याचे रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी म्हटले. प्राध्यापक देसाई यांनी रोटरॅक्ट च्या कामाचे कौतुक केले. आभार उपसरपंच देसाई यांनी मानले. परिक्षण केदार कणबर्गी व सूत्रसंचालन यशदा देसाई मॅडम यांनी केले.