बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा ग्रामस्थ मंडळींची कास य़ेथिल श्री वाघबिळकार देवस्थान पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. मंगळवारी दुपारी श्री बांदेश्वर भूमिका दर्शन करुन पदयात्रेसह आरंभ झाला. जाताना बांदा रामनगर येथिल श्री साईमंदिर, आरोसबाग येथिल श्री क्षेत्री देवस्थान आदींसह मार्गातील देवस्थांनांचे दर्शन घेत पदयात्री श्री वाघबिळकाराच्या गुहेत पोहोचले. तिथे देवाच्या झाडाचे दर्शन घेऊन नामस्मरण करण्यात आले त्यानंतर मंदिरात येऊन भजन व आरती करण्यात आली. तेथिल पदयात्रींच्या अल्पोपहाराची संपूर्ण व्यवस्था पत्रकार संजय भाईप यांनी केली. तसेच बांद्यातील व्यापारी प्रविण शिरसाट यांनी पदयात्रा मंडळाला टिशर्ट प्रदान केले. या पुढील पदयात्रा मंगळवार १६ रोजी सोनुर्ली व घोडेमुख येथे जाणार असल्याचे बांदा पदयात्रा मंडऴाचे अध्यक्ष उमेश मयेकर व उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी जाहीर केले आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -