मसुरे | प्रतिनिधी : यंदा मकरसंक्राती २०२४ निमित्त शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्काराने सूर्याची उपासना घडावी तसेच भारतीय प्राचीन ऋषीमुनींच्या योग सिद्धांतावर आधारित योग ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून बारा अंकांचा एक सूर्यनमस्कार याप्रमाणे १०८ सूर्यनमस्कार साधना करुन घेण्यासाठी १४ जानेवारी रोजी “महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्हा” तर्फे जिल्हास्तरीय सामूहिक १०८ सूर्यनमस्कार शिबीर गोरेगाव पश्चिम येथील व्हीनस कल्चर असोसिएशन गार्डन मध्ये सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील सर्व आदरणीय योगसाधक, योगप्रेमी व योगशिक्षकांनी नाममात्र १०० रु शुल्क भरून रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी केले आहे.
अधिक माहितीकरिता , संतोष खरटमोल: ९६९९३०९५३०,
निलेश मारुती साबळे ९७७३४४८७७९, प्रशांत मकेसर ९६१९११५८७३, अमित चिबडे ९८९२१७५५८३, कृष्णकुमार शिंदे, ८७७९१२९१०२ येथे संपर्क साधावा.