उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची प्रमुख उपस्थित.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ग्रामपंचायत करून यांच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून उभा करण्यात आलेला एक रुपयांमध्ये एक लिटर शुद्ध पाणी हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्तुत्य उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या मशीनमध्ये एक रुपया टाकल्यानंतर या मशीन मधून एक लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होते. फोंडा कणकवली हायवे लगतच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये ही मशीन बसवण्यात आली आहे. हायवे लगत बसवण्यात आल्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच गावातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ करूळ गावच्या सरपंच समृद्धी नर यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, उपसरपंच पुरुषोत्तम तानावडे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्या रिया धवन, ग्रामसेविका नयना मिठबावकर, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.