मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई’ यांचे १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भांडुपच्या गीता हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उपस्थितांचे स्वागत करीत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक धर्माजी पराडकर यांनी केले. सतिश कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभाला उद्योजक हेमंत कुबल व बबन सारंग तसेच परशुराम कोयंडे, शंकर पराडकर, दर्यावर्दीचे संपादक अमोल सरतांडेल व पत्रकार पांडुरंग भाबल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या १०वी,१२वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त सदस्यांचा त्यांच्या पत्नीसह यथोचित सत्कार करण्यात आला. तर सिंधुदुर्गची सागर सुंदरी सुमेधा कुबल व नाट्य दिग्दर्शक संतोष कोयंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी २०२४ च्या दिनदर्शिकेचे व डायरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अमोल सरतांडेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना उपस्थित महिलांचा आनंद वाखाणण्यासारखे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच गावच्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात हरिनाम सप्ताहातील लोकांचा उत्साह, माझा केलेला पाहुणचार, करंज्यांचा प्रसाद व एकूणच वातावरण पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले. मंडळाने संस्था उभी करून ती वाढवण्याचे शिवधनुष्य उत्तमपणे पेलल्याचे मान्य केले. तर पांडुरंग भाबल यांनी आपण आनंदवाडी गावावर लेखन केल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा देताना अशी संमेलने प्रत्येक गावातून व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर बबन सारंग व गौरी कुबल यांनी आपले विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सतिश कोयंडे यांनी सन्मानपात्र मुलांच्या अनुपस्थिती विषयी नाराजी व्यक्त करताना त्यांच्या पालकांना खडेबोल सुनावले. गौरी कुबल हिच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन नव्या पिढीने समाजकार्यात पुढे येऊन नवनवीन कल्पना मांडून त्या साकार कराव्यात. तसेच जरी आपण विखुरलो असलो तरी एकत्र येऊन साथ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू,लकी ड्रॉ व ग्रामस्थ बंधू,भगिनी व मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. सदर प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, मुंबई’ यांचे १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भांडुपच्या गीता हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. उपस्थितांचे स्वागत करीत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. यावेळी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक धर्माजी पराडकर यांनी केले. सतिश कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभाला उद्योजक हेमंत कुबल व बबन सारंग तसेच परशुराम कोयंडे, शंकर पराडकर, दर्यावर्दीचे संपादक अमोल सरतांडेल व पत्रकार पांडुरंग भाबल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या १०वी,१२वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त सदस्यांचा त्यांच्या पत्नीसह यथोचित सत्कार करण्यात आला. तर सिंधुदुर्गची सागर सुंदरी सुमेधा कुबल व नाट्य दिग्दर्शक संतोष कोयंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी २०२४ च्या दिनदर्शिकेचे व डायरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी अमोल सरतांडेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या कार्याचे कौतुक करताना उपस्थित महिलांचा आनंद वाखाणण्यासारखे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच गावच्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात हरिनाम सप्ताहातील लोकांचा उत्साह, माझा केलेला पाहुणचार, करंज्यांचा प्रसाद व एकूणच वातावरण पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले. मंडळाने संस्था उभी करून ती वाढवण्याचे शिवधनुष्य उत्तमपणे पेलल्याचे मान्य केले. तर पांडुरंग भाबल यांनी आपण आनंदवाडी गावावर लेखन केल्याचे सांगून जुन्या आठवणींना उजाळा देताना अशी संमेलने प्रत्येक गावातून व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर बबन सारंग व गौरी कुबल यांनी आपले विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात सतिश कोयंडे यांनी सन्मानपात्र मुलांच्या अनुपस्थिती विषयी नाराजी व्यक्त करताना त्यांच्या पालकांना खडेबोल सुनावले. गौरी कुबल हिच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन नव्या पिढीने समाजकार्यात पुढे येऊन नवनवीन कल्पना मांडून त्या साकार कराव्यात. तसेच जरी आपण विखुरलो असलो तरी एकत्र येऊन साथ देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू,लकी ड्रॉ व ग्रामस्थ बंधू,भगिनी व मुलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले. सदर प्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.