29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून ११ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार कोकण किनारपट्टी स्वच्छता मोहीम

- Advertisement -
- Advertisement -

सर्व सामाजिक, सेवाभावी संस्था, स्थानिक प्राधिकरण आणि नागरिकांनी सहभाग घेण्याचे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे आवाहन

कणकवली | उमेश परब (ब्युरो चीफ, सिंधुदुर्ग): मनसे नेते अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर येथे ११ नोव्हेंबर रोजी स्वच्छता उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. या स्वच्छता उपक्रमात जिल्ह्यातील सर्व पर्यावरणस्नेही, NGO, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.

अमित ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मनसेच्या पर्यावरण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण किनारपट्टीची पाहणी केली. यात कोणत्या किनारपट्टीवर किती कचरा आहे, कोणत्या किनारपट्टीची स्वच्छता करायची हे ठरविण्यात आले. हा उपक्रम जरी मनसेच्या माध्यमातून राबविला जात असला , तरीदेखील पर्यावरण स्वच्छता ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे हा एक सामाजिक उपक्रम म्हणून या उपक्रमामध्ये सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, ग्रामस्थ या सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं. तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका य स्थानिक प्राधिकारणांचाही यात मोठा सहभाग असणे आवश्यक आहे. वेंगुर्ले, मालवण येथे पर्यटकांच्या माध्यमातूनही स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे. समुद्र किनाऱ्यांच्या अस्वच्छतेचा प्रश्न हा पर्यटनामधील मोठी समस्या आहे. त्यामुळे आपले पर्यावरण स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी या स्वच्छता उपक्रमात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, वैभववाडी मनसे तालुकाध्यक्ष सचिन तावडे, देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!